आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Barmer Rajasthan Around Many People Died As Ram Katha Pandal Falls On Devotees

पावसामुळे कोसळला रामकथेचा मंडप, वीजेचा झटका लागून 12 जणांचा मृत्यू; 24 जण गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर(राजस्थान)- येथील बाडमेरमध्ये आज(23 जून) दुपारी रामकथेचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान वादळ आणि पावसामुळे मंडप कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहत. घटना बालोतराच्या जसोल परिसरात घडली.

 

डी.एम. हिमांशु गुप्तांनी सांगितले की, दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंडपात अधिक तर वृद्ध महिला आणि पुरुष होते, जे रामकथा ऐकायला आले होते. यात 24 जण जखणी आहेत, तर त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

पाऊस सुरूहोता आणि अशातच मंपड पडण्यासोबतच विजेच्या ताराही तुटल्या आणि त्यामुळे मंडपात सगळीकडे करंट पसरला. त्यामुळे अनेक जणांना करंट लागला असल्याची शक्यता आहे. पण, संपूर्ण तपास झाल्यावरच खरे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.