आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये बिंदुसरा नदीला पूर, दगडी पूल गेला पाण्याखाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : बीड तालुक्यातील कर्झणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बिंदुसरा प्रकल्पाच्या चादरीवरून तीन दिवसांपासून पाणी वाहत आहे. परिणामी बिंदुसरा नदीला पूर आला आहे. रविवारी शहरातील दगडी पुलावरून अशा प्रकारे पुराचे पाणी वाहू लागल्याने नागरिकांनी हे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

महंमद तुघलकाने बांधलेला पूल पाण्याखाली
१३२४ मध्ये तुघलकांचे राज्य होते. महंमदबीन तुघलक याने बीडची नवीन व्यापार पेठ तयार करत त्याला मेहबूब गंज नाव दिले होते. दळणवळणासाठी १३२४ मध्ये बीड शहरात हा दगडी पूल मोठ्या शिळा, दगड, चुना, तुरडाळ, अंडे असे मिश्रण करून बांधण्यात आला. आज जरी हा पूल खाली वाटत असला तरी तेव्हा नदी खोल होती.
 

बातम्या आणखी आहेत...