आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाराणसी - देवदिवाळीच्या निमित्ताने शुक्रवारी काशी दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघाली. ७ किमी लांबीच्या अर्धचंद्राकार ८४ घाट व ३६ कुंडांवर १५ लाख दिवे उजळवण्यात आले. सर्वाधिक म्हणजे ५१ हजार दिवे दशाश्वमेध घाटावर लावण्यात आले. दिवे उजळवण्यासाठी प्रत्येक घाटावर १०० हून जास्त स्वयंसेवक हजर होते. हा दीपोत्सव पाहण्यासाठी ३ लाख जनता घाटावर आली होती. २१ ब्राह्मणांनी गंगेची आरती केली.
या वेळी घाटावर गंगेच्या अष्टधातूपासून बनवण्यात आलेल्या १०८ किलो वजनाच्या मूर्तीस १०० किलो फुलांचा शंृगार केला होता. याप्रसंगी ७००० विदेशी पर्यटक उपस्थिती होती.
भैंसासुर घाटावर प्रथमच झाला लेसर शो
भैंसासुर घाटावर प्रथमच लेसर शोचे आयोजन केले. भगीरथ ऋषींनी गंगेला पृथ्वीवर कसे आणले, याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या शोमध्ये याचे सादरीकरण झाले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आले होते. या वेळी २१ ब्राह्मणांनी गंगेची आरती केली. विविध घाट दिव्यांनी उजळून निघाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.