आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये म्यानमार लष्करातील 3 एके-47 व 1850 काडतुसे जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बिहारच्या पूर्णिया येथे पोलिसांनी म्यानमारच्या लष्करातील ३ एके- ४७  रायफलसह १८५० राउंडची काडतुसे जप्त केल्या आहेत. दोन अंडर बॅरल ग्रेनेड लाँचरही(यूबीजीएल)सापडले आहेत. या लाँचर्समध्ये एके-४७ बसवून त्याने ग्रेनेड फेकता येतात. 

 

तस्कराच्या आंतरराष्ट्रीय टोळीने ही शस्त्रे सीमेपलीकडून पाठवली होती. ही शस्त्रे एका सफारी वाहनात लपवून आणून प. बंगालमार्गे पाठवण्यात येत होती. दरम्यान, पूर्णियाच्या वायसीजवळील दालकोला चेकपोस्टवर तपासणी सुरू असताना पोलिसांनी सफारी वाहनास थांबण्याचा इशारा केला. यातील लोक पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, परदेशी शस्त्रांचा साठाच हाती लागला.  

 

एडीजीचा फॉर्म्युला उपयोगी, सफारी वाहनामध्ये सापडली शस्त्रे  
गुप्तचर विभागात कार्यरत असलेले उत्तर-पूर्वेची जबाबदारी सांभाळणारे एडीजी कुंदन कृष्णन यांच्या अनुभवाचा व फॉर्म्युल्याचा फायदा येथील पोलिसांना झाला. गेल्या ७ फेब्रुवारीस पकडण्यात आलेल्या सफारीच्या पहिल्या झडतीत ६०० काडतुसे सापडली होती. पूर्णियाच्या पोलिस अधीक्षकांना याची माहिती दिल्यानंतर एडीजी कृष्णन यांनी त्वरेने सूत्रे हलवून सापडलेल्या सफारीची बारकाईने झडती घेण्याचे आदेश दिले होते. तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी घेतल्यानंतर शनिवारी व रविवारी सफारीची बॉडी उकलण्यात आली. तेव्हा यामध्ये एके-४७ सह १२०० काडतुसे या वाहनाचे छत, दार व सायलेन्सरच्या वर व इतर ठिकाणी कप्पे तयार करण्यात आले होते. यात एके-४७ चे सुटे भाग करून ठेवण्यात आले. सफारीवर आसामचा वाहन क्रमांक होता. 

 

आराच्या तस्करांना  देण्यात येणार होती शस्त्रे  
शस्त्रे आरा येथील तस्कर मुकेशसिंह व संतोषसिंह यांना देण्यात येणार होती. दोघे हिस्ट्रीशीटर आहेत. यात मुकेश याच्या घरी छापे टाकण्यात आले. तेथे ५० राउंड काडतुसे सापडली. संतोषसिंह यापूर्वीही शस्त्रांची तस्करी  व नागालँडमध्ये बनावट पासपोर्ट करण्याच्या प्रकरणात आरोपी होता.  जप्त करण्यात आलेल्या काडतुसांचा वापर इन्साससारख्या रायफलमध्ये करण्यात येतो.

 

नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवठा 
‘शस्त्रांची तस्करी करणारे एके -४७चा पुरवठा गुन्हेगारांबरोबरच नक्षलवाद्यांना करत असल्याचा संशय आहे. अटक केलेल्या आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. 
- कुंदन कृष्णन, एडीजी (मुख्यालय) 
 

बातम्या आणखी आहेत...