आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये भाजप-जदयूचे जागावाटपावर एकमत; प्रत्येकी 17, तर लोजपा 6 जागा लढवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एनडीएच्या घटक पक्षांपैकी भाजप, जदयू आणि लोजपा यांच्यावर बिहारमध्ये लोकसभा जागावाटपावर एकमत झाले आहे. भाजप आणि जदयू १७-१७ तर लोजपा ६ जागा लढवणार आहेत. तसेच लोजपा प्रमुख रामविलास पासवान यांना एनडीएचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवण्यात येईल. भाजप अध्यक्ष अमित शहा, जदयू अध्यक्ष नितीशकुमार आणि पासवान यांच्यात तासभर चाललेल्या बैठकीनंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात आला. 

 

अमित शहा यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत बिहारमध्ये एनडीए २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकेल. त्या वेळी राज्याच्या ४० जागांपैकी ३१ जागा एनडीएने जिंकल्या होत्या. कोणती जागा कुणाला मिळेल, याचा निर्णय तिन्ही पक्ष लवकरच घेणार आहेत. जागावाटपाच्या नव्या सूत्रात लोजपाची सरशी झाल्याचे समजले जात आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएसपी पक्षाने एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जास्त जागांची मागणी करत लोजपा आक्रमक झाली होती. २०१४ मध्ये भाजपने बिहारमध्ये ३० जागांवर निवडणुका लढवत २२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजप फक्त १७ जागाच लढवणार आहे. २०१४ मध्ये स्वबळावर लढणाऱ्या जदयूने दोन तर एनडीएसोबत लढलेल्या लोजपाने सहा जागा जिंकल्या होत्या. 

 

निरर्थक महाआघाडी : मोदी 
चेन्नईच्या भाजप कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगने संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाआघाडीवर वार करत ही विविध पक्षांची नापाक व निरर्थक महाआघाडी असल्याची टीका केली. 

 

वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीन गडकरींची सारवासारव
सर्वाेच्च नेतृत्वाने विजयाप्रमाणेच पराभवाचीही जबाबदारी घ्यावी, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. मात्र त्यावरून वाद झाल्यानंतर काही विरोधी पक्ष व माध्यमे वक्तव्याचा विपर्यास करत असल्याची सारवासारव गडकरींनी केली. शनिवारी पुण्यात गडकरी म्हणाले होते की, पराभवाची जबाबदारी कुणीही घेऊ इच्छित नाही. संस्थेबद्दल जबाबदारी सिद्ध करण्यासाठी नेतृत्वाने अपयशाचे उत्तरदायित्व स्वीकारायला हवे. रविवारी गडकरी म्हणाले, माझ्या व पक्ष नेतृत्वात वितुष्ट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...