Home | International | Other Country | In Britain, home-made trucks are being built by adding various parts, three BHK costs Rs 59 lakhs

ब्रिटनमध्ये विविध भाग जोडून बांधतात घर, ट्रकने पाठवतात, तीन बीएचकेची किंमत ५९ लाख रुपये

वृत्तसंस्था | Update - Dec 04, 2018, 10:48 AM IST

जमिनीच्या किमतीचा समावेश नाही, नाेकरदार वर्गाची घरांना पसंती

 • In Britain, home-made trucks are being built by adding various parts, three BHK costs Rs 59 lakhs

  लंडन- ब्रिटनमध्ये तयार घरांची (प्रीफॅब) मागणी जोरात सुरू आहे. यात घराचे बेडरूम, किचन, बाथरूम आधीच वेगवेगळी बांधलेले असतात. सर्व विविध डिझाइनमध्ये तयार केली जातात. नंतर ग्राहकांच्या पसंतीनुसार ते सेट करतात. सतत बदली होणाऱ्या नोकरदारांना अशी घरे आवडतात. याॅर्कशायरच्या इल्क फॅक्टरीत अशा प्रकारची प्रीफॅब घरे बांधून तयार आहेत. तीन बेडरूमच्या घराची किंमत ६५ हजार पाऊंड (६० लाख रुपये) आहे. यात जमिनीच्या किमतीचा समावेश नाही. घरांच्या वेगवेगळ्या भागांना एका ट्रकमध्ये भरून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यानंतर ठरलेल्या जागावर ही घरे ठेवली जातात. घराचे डिझाइन आपल्याला बदलता येते.

  नोकरदार लोकांच्या अडचणी दूर करणारी घरे.

  ब्रिटनमध्ये आर्किटेक्चरचा हा नवा प्रयोग आहे. पारंपरिकदृष्ट्या घर बांधण्यास ४० आठवडे लागतात. परंतु अशा प्रकारची घरे तयार करण्यास फक्त दहा दिवसांचा कालावधी लागतो. एकदा ट्रक जागेवर पाठवल्यानंतर घरांची जोडणी करण्यास फक्त ३६ तासांचा अवधी लागतो. ही घरे नोकरदार वर्गात लोकप्रिय होत आहेत.

  कंपन्यांत प्रीफॅब घरे बांधण्यासाठी चढाओढ
  प्रीफॅब घरे तयार करणाऱ्या इल्क होम्स या कंपनीचा दावा आहे की, आम्ही दरवर्षी दोन हजार घरे बांधण्याची तयारी ठेवली आहे. मागणी वाढत जाईल तशा प्रमाणात आम्ही ५ हजार घरे बांधून देऊ. आणखी एक लीगल अँड जनरल इन्शुरन्स कंपनीने लीड्स शहरात एका वर्षात ३५०० हजार घरे बांधण्याची योजना आखली आहे.

Trending