आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायात 'पीपल फर्स्ट' पॉलिसी नेहमीच फायदेशीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्यांची भाषणे मला आकर्षित करत नाहीत याची अनेक कारणे आहेेत. मात्र गुरुवारी जयपूरमध्ये आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये राजस्थानचे परिवहनमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी भाषणात एक घटना सांगितली आणि मी विचारात पडलो. त्यांनी सांगितले, 'काही महिन्यांपूर्वी मी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा अनेक विशेष सुविधा आयुष्याचा भाग बनल्या.' ते स्पष्टपणे म्हणाले, 'कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा होताच तसेच शपथ घेतल्यानंतर मला मिळालेली सरकारी गाडी ही सर्वात जलद सुविधा होती.'ते शपथ घेत होते तेव्हा गाडी त्यांच्या प्रतीक्षेत बाहेर उभी होती. सुविधेची ही गती पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. खाचरियावास शपथ घेऊन बाहेर पडले. समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांची नजर आपले खासगी वाहन शोधत होती. तेव्हा त्यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सरकारी गाडी वापरण्याचा आग्रह धरला. एकदम सरकारी गाडी घेण्यास त्यांचे मन तयार होत नव्हते. मात्र अधिकाऱ्यांचा आग्रह पाहून त्यांना बसावे लागले. ते पुढे म्हणाले की, 'नवनियुक्त मंत्र्यांसाठी हा गाड्यांचा ताफा तयार होता. चित्रपटाला साजेशे असेच हे दृश्य.' राज्यपालांच्या निवासाबाहेरून अनेक दिशांनी रस्ते दुभंगले होते. खाचरियावास यांनी आपल्या घरचा रस्ता पकडला. घरी परतत असताना त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू आला. त्यांनी गाडी थांबवली. काच खाली केली. समोरून एक व्यक्ती जवळ आली अन् म्हणाली, - भाईसाहब, देखो थाने जिता दियो न, थाने (आप) में यो पेली ही कियो हो, चिंता मत करो, थे जीतोळा।' त्याचे बोलणे ऐकून खाचरियावास गाडीतून खाली उतरले. त्या व्यक्तीची गळाभेट घेतली. म्हणाले, तूच मला जिंकून दिलंस. आता सांग, तुझे काय काम आहे ते? तो म्हणाला, 'तुम्ही जिंकलात हेच माझे काम.' त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पुन्हा एकदा त्याची गळाभेट घेतली. ती व्यक्ती म्हणाली, 'साहेब, तुम्ही जिंकताच ठेकेदारही सरळ झाला.' खाचरियावास म्हणाले, 'आता तुला नोकरीवर कायम करू.' तेव्हा व्यक्ती म्हणाली, साहेब, परमनंटची चिंता करू नका. तुम्ही जिंकल्यामुळे माझे सारे दु:ख हटले. खाचरियावास तेथून जायला निघाले तेव्हा तो म्हणाला, साहेब, आणखी काही काम असेल तर सांगा. ही अनोळखी व्यक्ती सिव्हिल लाइन्स रोडवर मळक्या कपड्यात झाडू मारणारी एक हंगामी कर्मचारी होती. खाचरियावास तेथून जात तेव्हा ती त्यांना हात हलवून अभिवादन करायची. ही घटना सांगून खाचरियावास म्हणाले, 'त्या दिवशी मला अतिशय आनंद झाला. त्या माझ्या झाडूवाल्या मित्राची मानसिक कणखरता आणि प्रसन्नचित्त मन पाहून मला अतीव आनंद झाला.' हा अनुभव सांगून मंत्री उपस्थित उद्योगपतींना म्हणाले, 'तुमच्यासमवेत काम करणारे लोक ही अमूल्य संपत्ती आहे. 'स्लो डाऊन'च्या सावटात तुम्हाला त्यांची नोकरी सांभाळावी लागेल. शक्य तेवढे सारे मी करेन. त्यासाठी माझा मोबाइल नंबर देत आहे. राज्य सरकारकडून काही मदत हवी असल्यास सांगावे. मुख्यमंत्र्यांचीही मदत घेण्याचा मी प्रयत्न करेन.' भाषण संपवण्यापूर्वी ते पुन्हा जोर देऊन म्हणाले, 'लक्षात ठेवा, आपले सहकारीच आपल्याला घडवतात.' त्यांचे भाषण ऐकून वातावरण सद््गदित झाले. त्यांनी सकारात्मकतेचे एक बीज रोवले होते. फंडा असा : आपलीच माणसे आपल्याला व्यवसायात पुढे नेत असतात. कधी काळ वाईट आला तरीही त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य असते.  

बातम्या आणखी आहेत...