आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्सा खुर्चीचा; मंत्रिमंडळ बैठकीत मानापमान नाट्य, खुर्चीत बसण्याच्या जागेवरून झाले वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : खातेवाटपानंतर मंगळवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नाराज मंत्र्यांच्या गैरहजेरीची पार्श्वभूमी असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुर्चीवरूनही दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे समजते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे दोघेही मंत्रिमंडळ बैठकीसाठी आले. परंतु बसण्याच्या जागेवरून दोघांमध्येही वाद झाला. माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे खाते असल्याने अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या जवळची खुर्ची पटकावली परंतु छगन भुजबळ यांनी त्या खुर्चीवर बसण्याचा हट्ट धरल्याने दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. या वादात अन्य मंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि अशोक चव्हाण यांना माघार घ्यावी लागल्याचे समजते.