आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ/ मुरैना - व्यक्तीचे अपहरण करून खंडणी करण्याच्या अनेक बातम्या आपण आतापर्यंत ऐकल्या किंवा वाचल्या असतील. परंतु मध्यप्रदेशातील चंबळमध्ये म्हशीचे अपहरण करून खंडणी घेतली जाते. ही गुन्हेगारी प्रवृत्ती अनेक दिवसांपासून बिनधास्तपणे सुरु आहे. स्थानिक भाषेत याला पन्हाई म्हटले जाते. पन्हाई म्हणजे मध्यस्थांमार्फत एकरकमी रक्कम घेऊन चोरी केलेली म्हैस त्याच्या मालकापर्यंत पोहोचवणे.
ही रक्कम म्हशीच्या किमतीच्या 30 टक्क्यांपर्यंत असते. गुरे चोर, त्यांचे दलाल आणि राजकारण्यांशी संपर्कासमोर चोरांचे नाव-पता माहीत असूनही पोलिस त्यांच्या गावात प्रवेश करू शकत नाहीत. कारण ते एकत्र येऊन पोलिसांना विरोध करतात. अनेकवेळा गोळीबार देखील केला जातो. पन्हाईचे बरीच प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. कारण पीडित व्यक्तीला यात अपमान वाटतो.
तीन उदाहरणे, म्हैस चोरी झाल्यावर पंचायत बोलावली, पैसै दिल्यानंतर परत मिळाली
1. पैसे न दिल्यामुळे प्रकरण रखडले
दिमनीच्या सिरमिति गावातून 1 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता जलदेवी नावाच्या विधवा महिलेची 60 हजार रुपयांच्या म्हैस चोरीला गेला होती. जलदेवी याबाबत तिघांवर संशय घेतला होता. पोलिसांना त्यांची नावे देखील सांगितली मात्र कारवाई झाली नाही. शेवटी महिलेने म्हैस मिळवण्यासाठी त्या तिघांविरोधात पंचायत बोलावली. पंचायतीसमोर त्या लोकांची नावे सांगितली. त्या तिघांनी शपथ घेऊन म्हैस परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र पैशांमुळे प्रकरण तसेच रखडले.
2. वीस हजार रुपये घेऊन म्हैस परत केली
पोरसा भागातील सींगपुरा येथे एप्रिलमध्ये अज्ञात चोरांनी धारा कोरी यांची म्हैस घरासमोरून चोरली होती. कोरी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली, मात्र यावर कारवाई झाली नाही. अखेर त्यांनी दलालांशी संपर्क साधला. यानंतर कुखथरीच्या पुरा गावात पंचायत पार पडली आणि याच दलालांमार्फत 20 हजार देऊन 60 हजारांची म्हैस परत मागवली.
3. पीडित पक्षाने ट्रॅक्टर पकडल्यांतर झाला करार
दोन वर्षांपूर्वी मुरैना गावातील धर्मेंद्र किरार यांची 80 रुपये किमतीच्या म्हशीची चोरी झाली होती. या चोरीमागे दोन्हारी गावातील लोकांचा हात असल्याचे माहीत झाले. यानंतर गावातील दाऊजी मंदिरात समाजाची महापंचायतती ठरवण्यात आले की, आमच्या बहुल गावातून म्हैस चोरी प्रकरणातील समुदायातील लोकांचे वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली निघाले तर त्यांना ताब्यात घेईल. यानंतर एक ट्रॅक्टर देखील पकडला. याच्या 10 दिवसांनंतर संबंधित समुदायातील लोकांनी चोरलेली म्हैस परत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.