Home | National | Other State | In Chandigarj a man proved himself dead for 40 lakh insurance claim

40 लाखांच्या विम्यासाठी व्यक्तीने तयार केला स्वतःच्याच मृत्युचा विडिओ, सोशल मिडीयावर केला शेअर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:37 PM IST

आरोपीने भाचाच्या मदतीने रचले षडयंत्र

 • In Chandigarj a man proved himself dead for 40 lakh insurance claim

  मोहाली - 19 नोव्हेंबर रोजी कार अपघातात जळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बिल्डर आकाश ऊर्फ आशू (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव होते. आकाशच्या पत्नीने त्याची हत्या केल्याचा आरोप केला होता. पण या अपघातात आकाशचा मृत्यू झाला नसून जिवंत असल्याचा नवीन खुलासा समोर आला आहे. बुधवार रोजी तडके पलवल येथे रेल्वेने प्रवास करताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने आपले रूप बदलेले होते. तर जळणाऱ्या गाडीतील मिळालेला मृतदेह आकाशकडे मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या राजूचा होता होता.

  आकाशने भाचा रवीच्या मदतीने राजूचा गळा आवळून खून केला आणि कारमध्ये बसवून कारला आग लावली होती. 40 लाख रूपयांच्या विम्यासाठी हे सगळं षडयंत्र रचवण्यात आले होते. आकाशकडे लाखोंची उधारी होती. ती फेडण्यासाठी त्याने हे षडयंत्र केले. पोलिसांनी आकाश आणि रवी यांना ताब्यात घेतले आहे. आकाश इतर नातेवाईकांचा यात काही हात आहे का याबाबत पोलिस शोध घेत आहे.

  चौकशी दरम्यान रवीने सांगितले सत्य

  नाहन पोलिस संबंधित प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी संशयावरून आकाशचा भाचा रवीची कसून चौकशी केली. दरम्यान त्याने बिल्डर आकाशचा मृत्यू झाला नसून राजू नावाच्या मिस्त्रीचा मृत्यू झाल्याचा खुलासा केला. राजस्थान येथील रहिवासी असणाऱ्या राजूचा गळा खून केला आणि मग कारमध्ये बसवून आग लावली. त्यानंतर जळणाऱ्या गाडीचा विडिओ तयार करून पोलिसांना पाठवण्यात आला.


  आधी पाजली दारू, मग गळा आवळून केला खून
  राजू राजस्थान येथील रहिवासी असून डेराबस्सी येथे राहत होता. आकाश आणि राजू यांच्या ठरल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जीरकपूर येथून राजूला घेऊन निघाले. तिघांनी रायपुररानी येथे मद्यपान केले. दरम्यान राजूला जास्त दारू पाजली. त्यानंतर दोन वेगवेगळ्या गाडीने देहरादूनकडे रवाना झाले. आकाश आणि रवी यांनी नाहन येथील नवोदय विद्यालयाजवळ राजूचा गळा आवळून खून केला. त्याला ड्रायव्हर सीटवर बसवून गाडीवल रॉकेल टाकून आग लावली.


  पोलिसांपासून लपण्याचा करत होता प्रयत्न
  आकाश पोलिसांपासून वाचण्यासाठी आपल्या जागा बदलत होता. राजूचा खून केल्यानंतर तो आधी जीरकपूर येथे गेला आणि तेथून त्याने दिल्ली गाठली. बिहारमध्ये असल्याचा पोलिसांना सुगावा लागला. नाहन पोलिसांनी मागील जार दिवसांपासून बिहारमध्ये लपलेल्या आकाशला पकडण्यासाठी छापेमारी करत होती. पण आकाश त्यांच्या तावडीत सापडत नव्हता. पोलिसांपासून बजाव करण्यासाठी आपले अड्डे बदलत होता. अखेर बुधवार रोजी पलवल येथे एका ट्रेनमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आले.


  इंग्लंड येथे मुलीकडे जाण्याच्या तयारीत होता आकाश
  आकाश डेराबस्सी आणि देहरादून येथे इमारीत बांधण्याचे काम करत होता. त्याने अनेक लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. लोकांचे पैसे देण्याची गरज पडू नये आणि इंशुअरंसचे पैसे पण मिळावे यासाठी त्याने हे षडयंत्र रचले. अपघतानंतर पत्नी आशा आणि भाचा रवी यांनी नाहन पोलिसांसमोर मिस्त्री राजू याचा मृतदेह आकाशचा समजून रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. इंश्योरेंसचे पैसे मिळाल्यानंतर इंग्लंडमधील मुलीकडे पळून जाण्याचा आकाशचा प्लान होता.


  स्वतः बनवला 'आपल्या मृत्यूचा विडिओ' आणि केला व्हायरल
  आरोपी रवीने चौकशी दरम्यान सांगितले की, पोलिसांचा विश्वास बसावा यासाठी आम्हीच जळणाऱ्या गाडीचा विडीओ तयार केला होता. जवळून जाणारे लोकही विडिओ चित्रित करत होते. आकाशने स्वतःच्या मृत्यूचा खोटा विडिओ स्वतःच व्हायरल केला होता. रवीने 20 नोव्हेंबर रोजी मिडीयाला सांगितले की, देहरादून येथील गुप्ता, रुचिका सोळंकी, आणि रवी भुल्लर यांच्याकडून आकाशच्या जीवाला धोका होता. त्याने आकाशच्या जीवाला धोका असल्याचे हाताने लिहिलेले पत्र देखील दाखवले. मिडीयाला दाखविलेले पत्र पोलिसांना न दाखवल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.


  यामुळे पोलिसांना आला संशय
  1. एक हलकी धडक बसल्याने गाडीला आग कशी लागली ही पोलिसांच्या घशाखालून जात नव्हती.

  2. हलकी टक्कर असेल तर मग गाडीने अचानक पेट कसा घेतला ? अशात ड्रायव्हर कस काय जिवंत जळू शकतो.

  3. घरवाले आणि रवी मृत्यूप्रमाणपत्रासाठी घाई करत होते. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.


  पोलिसांना अगोदरपासूनच होता संशय
  पोलिसांना पहिल्यादिवसापासून या प्रकरणासंबंधी संशय होता की, एका साधारण धडकेने कारला आग नाही लागू शकत. लागली जरी तरी ड्रायव्हरला त्यातून सुटका करवून घेता येते. पोलिस शांततेत आपले काम करत होते. आणि आता परिणाम सर्वांसमोर आला असल्याचे नाहनचे एसएचओ विजय रघुवंशी यांनी सांगितले.

Trending