आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
साउथ कॅरोलिना- अमेरिकेत 54 वर्षीय महिला रविवारी रात्री साउथ कॅरोलिनाच्या इंटरस्टेट 95 हायवेवरुन प्रवास करत होती, तेव्हा अचानक तिच्या गाडीचे टायर फुटले. त्यानंतर महिला कार थांबवून जॅकच्या साहाय्याने टायर बदलू लागली. यादरम्यान जॅकवरुन गाडी घसरली आणि महिलेच्या हातांची बोटे टायरमध्ये दबल्या गेली. यानंतर महिलेने अथक प्रयत्न करुनही तिला आपल्या हातांची सुटका करता आली नाही.
त्यानंतर महिलेने एक शक्कल लढवली आणि पायांच्या मदतीने पर्समधील फोन काढून आपातकालिन नंबर 911 डायल केला. त्यानंतर काउंटी फायर रेस्क्यू टीम घटनास्थळावर पोहचली आणि 35 मिनीटांपासून टायरखाली हात अडकलेल्या महिलेची सुटका केली. रेस्क्यू टीमने हायड्रॉलीक्सच्या मदतीने कार उचलून महिलेला वाचवले आणि जवळील रुग्णालयात दाखल केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.