आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूर नगर परिषदेचा लाचखोर कर संग्राहक एसीबीच्या जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर- पातूर नगर परिषदेमधील प्रभारी कर संग्राहक नबी खाँ रहिम खाँ (वय ५१ वर्षे) याला एक हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी रंगेहात अटक करण्यात आली. या घटनेने पातूर नगर परिषदेत खळबळ उडाली आहे. 


या प्रकरणातील फिर्यादी व्यक्तीने (वय ३६ वर्षे) याने नवीन घर विकत घेतले होते, त्याची नोंद करण्यासाठी पातूर नगर परिषदेतील कनिष्ठ लिपिक व सध्या कर संग्राहक पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारा नबी खाँ रहिम खाँ याने त्याच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु, तडजोडीनंतर एक हजार रुपये देण्याचे ठरले होते. या संदर्भात फिर्यादी याने अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी तक्रार दाखल केली. त्यानुसार, पडताळणी करून शुक्रवारी सायंकाळी नबी खाँ रहिम खाँ याला पैसे देण्याचे ठरले. शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. पातूर येथील जिल्हा बँकेच्या परिसरात आरोपी नबी खाँ रहिम खाँ याला फिर्यादीकडून एक हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तक्रारकर्त्याने नवीन घर घेतले होते. त्या खरेदी केलेल्या घराची तक्रारकर्त्याच्याच नावावर नगर परिषदेच्या अभिलेखात नोंद करण्यासाठी आरोपीने ही लाच स्वीकारली. लाचेची रक्कम जप्त करून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्यासह गजानन दामोदर, सुनील राऊत, कैलास खडसे, प्रवीण कश्यप यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...