आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In China, Now The Payment By Smartphones Is An Old Think, Now In Many Cities, Payment Will Done By Face

चीनमध्ये आता स्मार्टफोनने पेमेंट ही जुनी बाब, आता अनेक शहरांत चेहऱ्याच्या माध्यमातून देतात पैसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - भारतात सध्या डिजिटल पेमेंटवर खूप जोर देण्यात येत आहे. त्यासाठी स्मार्टफोनचा वापरही वाढला आहे. अॅप डिजिटल पेमेंटसाठी पेटीएम, फोनपे, मोबीक्विकसारखे अनेक अॅप उपलब्ध आहेत. मात्र, आपला शेजारील देश सध्या याबाबत आपल्याही एक पाऊल पुढे गेला आहे. त्या ठिकाणी नगदी किंवा कार्ड पेमेंट तर सोडा, स्मार्टफोन आणि डिजिटल वॉलेटने पेमेंट करण्याची पद्धतही जुनी झाली आहे. “फेशियल पेमेंट’ सेवेमुळे आता या पद्धती मागे पडल्या आहेत. चिनी लोक वस्तूची खरेदी करतात आणि स्वत:च्या चेहऱ्याच्या माध्यमातून पेमेंट करतात. लोकांना कॅमेऱ्याशी जोडण्यात आलेल्या पीओएस मशीनच्या समोर उभे करताच पेमेंट होते. त्यासाठी त्यांना आधी एकदा त्यांच्या चेहऱ्याला बँकेतील खात्याशी डिजिटल पेमेंट प्रणालीसोबत लिंक करावे लागते. चीनमध्ये सुमारे वर्षभरापूर्वीच ही सेवा लाँच झाली होती आणि आता चीनमधील १०० शहरांमध्ये या सेवेचा विस्तार झाला आहे. 

“फेशियल रिकॉग्निशन सॉफ्टवेअर’ला पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. आता या प्रणालीचा वापर व्यवहारासाठीदेखील करण्यात येत आहे. या पेमेंट प्रणालीसंदर्भात लोकांच्या मनामध्ये डाटा चोरी किंवा खासगी माहिती लीक होण्यासारखीही भीती आहे. असे असले तरी लोकांनी या प्रणालीला अत्यंत तेजीने स्वीकारले आहे. चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचा फायनान्शियल विभाग अली-पे या सेवेमध्ये अव्वल स्थानी आहे. चीनमधील सुमारे १०० शहरांमध्ये अली-पेच्या फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. 

हैदराबाद विमानतळावर प्रवेशासाठी वापर सुरू
फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर भारतामध्ये अत्यंत मर्यादित होतो. अलीकडेच हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवेशासाठी याचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याची प्राथमिक चाचणी झाली आहे. डिजिटल पेमेंटसंदर्भातील काही कंपन्याही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विचार करत आहेत. मात्र, ही सेवा कधी लाँच होईल, या संदर्भात सध्या काहीही स्पष्ट सांगता येत नाही.बातम्या आणखी आहेत...