आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In China, The Death Of 170 People Due To Corona Virus, 4 Thousand 334 Patients Are Still Undergoing Treatment At The Hospital

चीनमध्ये मृतांचा आकडा 170 वर, 4 हजार 334 रुग्णांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूची ७ हजार ७११ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या विषाणूमुळे मरणाऱ्यांची संख्या १७० झाली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. या आधी हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाने राज्याची राजधानी वुहानमध्ये बुधवारी कोरोना व्हायरसचे ३५६ नवे प्रकरणे समोर आल्याचे तसेच यामुळे आणखी २५ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

बुधवारपर्यंत हुबेईत कोरोना विषाणूच्या एकूण ४ हजार ५८६ प्रकरणांची पुष्टी झाली होती. यातील ४ हजार ३३४ रुग्णांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील २७७ जणांची प्रकृती गंभीर आहे. हुबेई प्रांतात कोराेनाचे आणखी १ हजार ३२ प्रकरणे समोर अाली, तर आणखी ३७ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने गुरुवारी सांगितले.

अमेरिकेत टास्क फोर्सची स्थापना 

कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टास्क फोर्सची स्थापना केली. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याबरोबरच अमेरिकेतील लोकांचे आरोग्य व प्रवासासंदर्भात माहिती ठेवण्याचे काम आरोग्य विभागाचे अॅलेक्स अजार यांच्या नेतृत्वात टास्क फोर्स करेल.
 

बातम्या आणखी आहेत...