आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In China, The Death Toll Rises To 2870, With 35329 Patients Still Undergoing Treatment

चीनमध्ये मृतांची संख्या २,८७० वर पोहोचली, ३५ हजार ३२९ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हुबेई प्रांतात ३४, तर हेनाॅन प्रांतात एकाचा मृत्यू

बीजिंग- चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८७० झाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. चीनमध्ये संसर्ग झालेल्या नवीन प्रकरणांची संख्या ५७३ आहे, तर ३५ जणांचा मृत्यू झाला. 

राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, हुबेई प्रांतात ३४, तर हेनाॅन प्रांतात एकाचा मृत्यू झाला. १३२ संशयित प्रकरणे समोर आली. त्याशिवाय शनिवारी २ हजार ६२३ जण योग्य उपचार करून घरी परतले. ३५ हजार ३२९ रुग्णांवर अद्यापही उपचार केले जात होते. ८५१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मानले जाते. हाँगकाँगच्या परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला, तर ९५ जणांना बाधा झाल्याचा दावा केला.

इटलीत १०२९ लोकांना बाधा, २९ जणांचा मृत्यू : कोरोना विषाणूमुळे आणीबाणीसंबंधी विभागाच्या आयुक्त अँजेलो बोरेली म्हणाले, सुमारे ५४३ जणांपैकी ४०१ लोकांना स्वतंत्रपणे निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. उर्वरित लोकांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारण त्यांच्यात अशा प्रकारची लक्षणे दिसून आली नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. इटलीतील मृतांची संख्या २९ एवढी झाली आहे. 

दक्षिण कोरियात १७ जणांचा मृत्यू  

दक्षिण कोरियात विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ३ हजार ५२६ लोक त्रस्त आहेत. कोरियात १७ जणांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियात कोरोना झालेल्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाचे प्रकरण २० जानेवारी रोजी समोर आले होते. वुहानची एक चिनी महिला तपासणीत पाॅझिटिव्ह आढळून आली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...