• Home
  • Gossip
  • In comedy movies demand for VFX is increased, the same technique will be displayed in 'Housefull 4'

Bollywood / कॉमेडी चित्रपटांत वाढली व्हीएफएक्सची मागणी, याच टेक्निकने 'हाउसफुल 4' मध्ये तयार दाखवला जाणार आहे राजा-महाराजांचा काळ  

आता विनोदी चित्रपटांचीही वाढली मागणी 

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 01:53:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : यावर्षी रिलीज झालेला मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट 'टोटल धमाल' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यात उत्कृष्ट व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला होता. या चित्रपटाचे यश पाहून आता इंडस्ट्रीत विनोदी धाटणीच्या चित्रपटांत अनेक प्रकारचे प्रयोग करण्याचा कल वाढला आहे. या चित्रपटासाठी निर्माते अशा प्रकारचा सेट उभारणार आहेत. यापूर्वी बाहुबली चित्रपटासाठी असा सेट उभारण्यात आला होता. आगामी विनोदी चित्रपट 'हाउसफुल 4'मध्येही दमदार व्हीएफएक्सचा प्रयोग करण्यात येणार आहे. जाणून घेऊया याविषयी...

दिवाळीपर्यंत पूर्ण होईल चित्रपट...
दिग्दर्शक फरहाद सामजी म्हणाले.., या चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. आता चित्रपटात व्हिज्युअल्स घेण्याची पद्धत सुरू होईल. अॅक्शन आणि इतर धाटणीच्या चित्रपटांप्रमाणेच विनोदी चित्रपटाच्या स्केलमध्येही वाढ झाली आहे. असो, आम्हाला दिवाळीपर्यंत वेळ मिळाला पाहिजे. अजून बॅकग्राउंड आणि डबिंग सर्व काही राहिले आहे. यावर पुढच्या महिन्यापासून काम केले जाईल. दिवाळीपर्यंत काम पूर्ण व्हावे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून सर्वांनी सुखाने दिवाळी साजरी करावी.

काय आहे स्थिती...
या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. दिवाळीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. तोपर्यंत याच्या पोस्ट प्रॉडक्शन आणि विशेष इफेक्ट्सवर काम केले जाणार आहे.

आवाजातदेखील होईल बदल...
चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओलसह अनेक कलाकारांचा आवाजदेखील बदलण्यात येईल. त्यांना मागच्या जन्मातील दाखवले जाणार आहे. हा सर्व बदल डबिंगच्या वेळी करण्यात येईल.

व्हीएफएक्सची गरज का पडली...
चित्रपटात दोन काळ दाखवले जाणार आहेत. एक आजचा काळ, तर दुसरा राजा-महाराजांचा काळ. जुना काळ व्हीएफएक्सच्या मदतीने उभारला जाईल.  चित्रपटाच्या सेटवरून अक्षय कुमारचा एक फोटो समोर आला होता. चित्रपटात त्याचा मागचा जन्म दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटामुळे वाढली विनोदी चित्रपटांत व्हीएफएक्सची मागणी...
- टोटल धमाल
154.23 कोटी
- गोलमाल अगेन
205.69 कोटी
- चेन्नई एक्स्प्रेस
227.13 कोटी

नानाच्या प्रश्नावर मौन...
या चित्रपटात आधी नाना पाटेकर महत्त्वाची भूमिका बजावत होते, पण नंतर त्यांच्यावर मी टूचा आरोप झाल्यानंतर त्यांना काढून टाकले हाेते. मात्र, आता नानाला क्लीन चिट मिळाली आहे, त्यामुळे त्यांना घेणार काॽ असे विचारले असता फरहादने यावर मौन धरले. नानाच्या जागी आता राणा दग्गुबत्तीला घेतल्याचे त्याने सांगितले.

X
COMMENT