आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In December, The Manufacturing Sector Index Hit A Six month High, Starting In The New Year, Impacting Production, Investment, Employment Growth.

डिसेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील निर्देशांक ७ महिन्यांच्या उच्चांकावर, नववर्षाच्या सुरुवातीस उत्पादन, गुंतवणूक, रोजगार वृद्धीवर परिणाम शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील निर्देशांकात डिसेंबर महिन्यात सुधारणा नोंदली गेली, मात्र २०२० च्या आर्थिक उत्पादनाबाबत कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आयएचएस मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय) डिसेंबरमध्ये वाढून ५२.७ वर पोहोचला. हा नोव्हेंबरमध्ये वाढून ५२.२ वर होता. ही गेल्या ७ महिन्यांतील सर्वात मोठी उसळी आहे. यादरम्यान कंपन्यांना मिळालेल्या नव्या कंत्राटामुळे जुलैनंतर सर्वात वेगवान वाढ नोंदली आहे. उत्पादन वाढल्यामुळे कंपन्यांनी नवी बहालीही सुरू केली.गुरुवारी जारी केलेल्या पीएमआय मासिक सर्वेक्षणानुसार, कंपन्यांच्या चिंतेमुळे नववर्षाच्या सुरुवातीस उत्पादन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. आयएचएस मार्केटच्या पॉलियाना डी. लिमा यांनी सांगितले की, व्यावसायिकांच्या चिंतेची माहिती विश्वासाच्या स्तरावरून कळते. २०१९ च्या अखेरीस व्यावसायिकांच्या आशेचा स्तर तीन वर्षांच्या नीचांकावर आले आहे.

  • मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय सलग २९ व्या महिन्यात ५० वर
  • फेब्रुवारी २०१९ मध्ये बांधकाम पीएमआय इंडेक्स उच्च स्तरावर
  • ऑक्टोबर महिन्यात सर्वात कमी होता पीएमआय इंडेक्स

निर्यातीचे कंत्राट वाढल्यामुळे एकूण विक्रीत वाढ पाहण्यास मिळाली

आयएचएस मार्केटच्या मुख्य अर्थतज्ञ पॉलियाना डि लिमा म्हणाल्या, मागणी वाढल्यामुळे कंपनीला लाभ झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी मेनंतर उत्पादनात सर्वात वेगवान वाढ झाली. डिसेंबरमध्ये नवी गुतवणूक खरेदी आणि रोजगारतही वाढ झाली. पाहणीनुसार नव्या कंत्राटामुळे जुलैनंतर सर्वात तेज वाढ झाली. विदेशी मागणी वाढल्यामुळै विक्रीत वाढ नोंदली गेली. सलग २६ व्या महिन्यात निर्यातीच्या ठेक्यांत वाढ झाली.

मॅन्युफॅक्चरिंग महागाई १३ महिन्यांच्या उच्च स्तरावर

मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय २९ व्या महिन्यात ५० वर आहे. क्षेत्रात महागाई १३ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे. इनपूट खर्च आणि आऊटपूट चार्ज दोन्हीत महागाई वेगाने वाढली. आऊटपूट चार्जमध्ये वाढ ही प्राइसिंग पॉवर वाढल्याचे स्पष्ट करते.

५० वर पीएमआय अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जाते

पीएमआय मॅन्युफॅक्चरिंगची आर्थिक प्रकृती मोजण्याचे एक इंडिकेटर आहे. यातून देशाच्या आर्थिक स्थितीचे आकलन होते. पीएमआय आकड्यांत ५० ला आधार मानला आहे. ५० वरील आकडे व्यावसायिक हालचाली विस्तार दाखवते.
 

बातम्या आणखी आहेत...