आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- अनेक ऑफर्स दिल्यानंतरही २०१८ मधील अखेरचा महिना वाहन कंपन्यांसाठी मंदीचा ठरला. प्रवासी वाहन बनवणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या विक्रीत देशांतर्गत बाजारात पाच टक्केही वाढ झालेली नाही. ह्युंदाईने सर्वाधिक ४.६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन बनवणारी कंपनी मारुती सुझुकीने डिसेंबरमध्ये १.२१ लाख वाहनांची विक्री केली. डिसेंबर २०१७ च्या तुलनेत ही विक्री केवळ १.८ टक्के जास्त आहे. महिंद्रा अँड महिंद्रा च्या विक्रीत तर घट नोंदवण्यात आली आहे. वाहन क्षेत्रातील कंपन्यांची संघटना सियामच्या माहितीनुसार सणांचा हंगाम असतानाही ऑक्टोबर महिन्यातील वाहनांच्या विक्रीत केवळ १.५५ टक्क्यांची वाढ झाली होती. नोव्हेंबरमध्ये यात ३.४३ टक्के घट झाली होती. जानेवारीपासून सर्वच कार कंपन्यांनी दरात वाढ करण्याची घोषणा आधीच केलेली आहे.
मारुतीच्या छोट्या कार, अल्टो आणि वॅगन आरची विक्री देशांतर्गत बाजारात १४ टक्के कमी झाली आहे. कॉम्पॅक्ट श्रेणीमध्ये स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरमध्ये ३.८ टक्क्यांची घट झाली आहे. वास्तविक सियाजच्या विक्रीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. या कारची विक्री ९८.७ टक्के वाढली आहे. युटिलिटी श्रेणीमध्ये विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि अर्टिगामध्ये ४.९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्व प्रवासी वाहनांची विक्री केवळ एक टक्क्यांनी वाढली आहे. मारुतीची निर्यात ३६.४ टक्के कमी झाली आहे. निर्यात १०,७८० च्या तुलनेमध्ये ६.८५९ वर आली आहे. देशांतर्गत बाजार आणि निर्यात मिळून एकूण विक्रीत १.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
होंडा कारच्या देशातील विक्रीत चार टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश गोयल यांनी सांगितले की, डिसेंबरमध्येही बाजार आव्हानात्मक राहिला. मात्र, वर्षा अखेरच्या ऑफरमुळे आमच्या काही मॉडेलची विक्री चांगली नोंदवण्यात आली. केवळ एक टक्के वाढ नोंदवणाऱ्या टाटा मोटर्सच्या प्रवाही वाहतूक श्रेणीचे अध्यक्ष मयंक पारीख यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये पूर्ण वाहन उद्योगामध्ये मंदी नोंदवण्यात आली.
ग्रामीण भागातील मागणी वाढण्याची अपेक्षा
महिंद्राचे अध्यक्ष राजन वढेरा यांच्या मते यामागचे कारण नगदीचे कमी आणि नकारात्मक धाेरण आहे. त्यांनी मार्च तिमाहीमध्ये ग्रामीण भागातील मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. फेब्रुवारीमध्ये लाँच होणाऱ्या एक्सयूव्ही-३०० च्या विक्रीबाबतही कंपनीला बऱ्याच अपेक्षा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.