Home | National | Delhi | In Delhi's Diwali dawn pollution, the lowest low

दिल्लीकरांची दिवाळी पहाट प्रदूषणात, आणखी नीचांक: प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न

वृत्तसंस्था | Update - Nov 08, 2018, 10:03 AM IST

हवेची गुणवत्ता जास्त खालावल्याने परिस्थिती वाईट बनली आहे.

  • In Delhi's Diwali dawn pollution, the lowest low

    नवी दिल्ली - राजधानी दिल्लीचा श्वास प्रदूषित हवेमुळे कोंडले जात आहेत. दिल्लीकरांची दिवाळी पहाट प्रदूषणाने आणखीनच नकोशी करणारी ठरली. हवेची गुणवत्ता जास्त खालावल्याने परिस्थिती वाईट बनली आहे.


    बुधवारी दिल्लीत सकाळी हवेची गुणवत्ता पातळी २६८ एवढी नोंदवण्यात आली होती. ती अतिशय वाईट मानली जाते, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. त्या अगोदर दिल्लीत हे प्रमाण २७६ वर दिल्लीतील २८ भागांत हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढल्याने शुद्ध हवेचा अभाव आढळून आला आहे. ही गंभीर स्थिती मानली जाते. दोन भागांत मात्र स्थिती काहीशी ठीक होती. प्रदूषणाशिवाय दिल्लीत बुधवारी दिवसभर धुकेही दाटलेले होते.


    वायव्येकडून येणाऱ्या वाऱ्यातून बायाेमॅसचे प्रदूषके दिल्ली-एनसीआर भागात वाहतील. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारीदेखील हीच स्थिती राहील, असा दावा हवामान विभागाने केला आहे.वाऱ्याच्या दिशेत बदल : वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल हवेतील गुणवत्तेच्या घसरणीमागील एक कारण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळेच पीएम-२.५ अशी वाढ झाली आहे.

Trending