आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मनीष भल्ला
कोहिमा - जगात अनेक देशांत महिला कामगारांची संख्या खूपच कमी आहे. यात भारत दहाव्या स्थानावर आहे, तर २०१९-२०च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशात सर्वात कमी मजुरी नागालँडमध्ये फक्त १३६ रुपये आहे. या वास्तवतेपेक्षा भिन्न परिस्थिती नागालँडमधील फेक जिल्ह्यातील चिजामी गावात आहे. या गावात सर्व पुरुषच नव्हे, तर महिलाही काही ना काही काम करून कमावतात. गावात किमान रोजगारही पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे ४५० रुपये आहे. या महिलांनी आपल्या पारंपरिक विणकामात आधुनिकता आणली आणि उत्पन्नाचे मोठे साधन तयार केले. आज या महिलांनी तयार केलेल्या शाल, मफलर, पर्स, वॉल हँगिंग मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा बाजारपेठांतून दिसतात. हस्तकला व हँडलूम एक्स्पोर्ट कॉर्पोरेशन हे सर्व सामान निर्यातही करत आहे. येथे महिलांची कमाई गावातील पुरुषांपेक्षा अधिक आहे. चिजामी वीक्स नावाने हा प्रसिद्ध ब्रँड ठरला आहे. ईशान्य सामाजिक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. हेक्टर डिसुझा सांगतात, “या कष्टकरी महिला पहाटे ३-४ वाजता उठतात. सकाळी लोकरीचे विणकाम, दुपारी शेतीत काम आणि सायंकाळी पुन्हा विणकाम करतात. यासोबत कुटुंबाचे पालनपोषण व स्वयंपाकही महिलाच करतात. २००८ मध्ये या महिलांनी विणकामाचे वेगळे मॉडेल तयार करणे सुरू केले.’ ही कल्पना सेनो सुहाह यांची होती. सेनो सांगतात, प्रत्येक घरात विणकाम केले जाते. जवळपास १६ गावांतील ६०० महिला हे काम करतात. वार्षिक उलाढाल ५० लाखावर आहे. ऐतशोले थोपी म्हणाली, येथे प्रत्येक महिला कमावते.
महिलांना मिळतो पुरुषांच्या बरोबरीने रोजगार
पुरुषांच्या बरोबरीने रोजगार मिळावा म्हणून येथील महिलांनी ७ वर्षे संघर्ष केला. यानंतर २०१४ मध्ये ग्रामसभेने दोघांचा रोजगार समान केला. महिला-पुरुषांना शेतीत ४०० ते ४५० रुपये मिळतात, तर दुसरीकडे देशात महिलांना पुरुषांपेक्षा २२ टक्के कमी रोजगार मिळतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.