Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | In eight days, 24 veteran leaders have come to power in Aurangabad

आठ दिवसांत 24 मातब्बर नेत्यांनी औरंगाबादेत लावली शक्ती पणाला, औरंगाबादसह जालन्यात प्रचार थंडावला

प्रतिनिधी | Update - Apr 22, 2019, 09:30 AM IST

औरंगाबादसह जालन्यात प्रचार थंडावला, आता पक्षाच्या यंत्रणेवर भर

 • In eight days, 24 veteran leaders have come to power in Aurangabad

  औरंगाबाद - आठ ते दहा दिवसांपासून शहरात सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी अखेर रविवारी शांत झाली. या काळात विविध पक्षांच्या मातब्बर नेत्यांनी शहरात व जिल्ह्यात आपल्या उमेदवारासाठी तळ ठोकला, तर काही पक्षांचे नेते अजूनही वॉररूममध्ये तळ ठोकून आहेत. प्रचार आणि सभानंतर झालेली वातावरणनिर्मिती मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी उमेदवारांनी रविवारी संध्याकाळपासूनच यंत्रणेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.


  औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी २३ उमेदवार रिंगणात असून त्यांचा प्रचार करण्यासाठी २४ मातब्बर नेते प्रचारासाठी येऊन गेले. यात शिवसेना-भाजपचे १३ नेते होते. आता उमेदवाराने बूथचे नियोजन लावण्यास सुरुवात केली आहे. किमान एका बूथसाठी दहा कार्यकर्ते नेमले असून मतदान केंद्रापर्यंत मतदारांना नेणे हे बूथ कमिटीचे मुख्य लक्ष्य आहे.

  चंद्रकांत खैरे
  चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी भाजप व शिवसेनेचे स्टार प्रचारक येऊन गेले. सभा, रोड शो झाले. पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. मुंबईहून आयटी सेलची खास टीम शहरात आहे. नितीन गडकरी, अमित शहा , देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शहानवाज हुसेन आदींच्या सभा झाल्या.

  सय्यद इम्तियाज जलील
  वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची प्रचार यंत्रणा सांभाळण्यासाठी हैदराबादहून खास पथक आले. असदुद्दीन ओवेसी स्वत: ३ दिवस शहरात तळ ठोकून होते. याशिवाय प्रकाश आंबेडकर, वारिस पठाण, जाफर हुसेन , मेराज हुसेन यांनी सभा घेतल्या.

  सुभाष झांबड
  काँग्रेस-महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी सोशल मीडियाचा वापर करत स्थानिक कलावंतांचा शहरातील समस्येवरील व्हिडिओ, कॉल, एसएमएस व होर्डिंग यांचा वापर केला. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नवज्योतसिंग सिद्धू , धनंजय मुंडे आदींच्या सभा गाजल्या.

  हर्षवर्धन जाधव
  हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी जाहिराती, सोशल मीडिया आणि कॉर्नर बैठका तसेच सभांवर भर देत प्रचार यंत्रणा राबवली. जाधव यांनी थेट चंद्रकांत खैरे यांना लक्ष्य करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी अडचणीची समजली जाते.

  जालन्यातील गावागावांत प्रचारफेऱ्या

  शेवटच्या दिवशी भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सुरेश धस, पंकजा मुंडे यांची सभा झाली. आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ गावागावांतून प्रचारयात्रा निघाल्या. वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ रॅली काढून थेट भेटीवर भर दिला.

Trending