आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In England, The Boy Ate Ate Only Chips, Burgers And Fast Food For Ten Years; He His Vision And Hearing Capacity

DVM Special : इंग्लंडमध्ये मुलाने १० वर्षांपर्यंत चिप्स, बर्गर आणि फास्ट फूड शिवाय काहीच खाल्ले नाही; दृष्टी गेली, ऐकू येणेही कमी झाले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्टल (इंग्लंड) : इंग्लंडमध्ये एका १७ वर्षाच्या मुलाची दृष्टी गेली, त्याला ऐकूही कमी यायला लागले. याचे कारण आहे, गेल्या दहा वर्षांपासून चिप्स, बर्गर, फ्रेंच फ्राइज, सॉसेसच्या व्यतिरिक्त काहीच खाल्ले नाही. कधी कधी हॅम आणि व्हाइट ब्रेड खाल्ला, म्हणजे एवढी वर्ष तो फक्त जंक फूडवर अवलंबून राहिला. प्राथमिक शाळा उत्तीर्ण केल्यानंतर हेच त्याचे अन्न झाले. 

ब्रिस्टल येथील मुलांच्या रुग्णलयातील डॉक्टरांचे म्हणने आहे की, इंग्लंडमधील ही पहिलीच घटना आहे. सध्या या मुलावर ब्रिस्टलच्या नेत्र रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार करणारे डॉ. डेनाइज एटन यांचे म्हणने आहे की, या मुलाने खाण्यात फक्त जंक फूडचाच वापर केला. कधीच फळे, भाजी खाल्ली नाही. त्याला अनेक फळांचे, भाज्यांचे रंग व स्वाद पसंत नाहीत. यामुळे चिप्स आणि प्रिंगल्स हेच त्याचे भोजन झाले होते. यामुळे मुलाला अवॉइडेंट- रिस्ट्रिक्टिव्ह फूड इंटेक डिसऑर्डर झाला आहे. याला आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे असेही म्हणता येईल. प्रक्रिया केलेल्या अन्नात साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. हाडे ढिसूळ झाली आहेत. डॉक्टरांचे म्हणने आहे की, मुलाचे वजन योग्य आहे. त्याची उंची आिण बीएमआय देखील सामान्य अाहे. मात्र, इटिंग डिसऑर्डरमुळे त्याची ही स्थिती झाली आहे. जी या वयाच्या मुलांमध्ये दिसत नाही. त्याला जीवनसत्व देण्यात आले. मानसिक आरोग्य पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. पण याचा फायदा झाला नाही. मुलाच्या डोळ्यात ब्लाइंड स्पॉट झाले आहेत. ऑप्टिक नर्व फायबर नष्ट झाले आहेत. यामुळे त्याची दृष्टी परत येणे शक्य नाही. आता हे प्रकरण केस स्टडी म्हणून इंग्लंडच्या एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये सामिल करण्यात आले आहे.  

आवश्यक जीवनसत्व-मिनरलच्या कमतरतेने ऑप्टिक नर्व्हचे नुकसान 
डॉ. एटम यांच्या म्हणन्यानुसार त्याच्या शरीरात व्हिटामिन बी १२ खूप कमी झाले होते. तसेच आवश्यक कॉपर, सेलेनियम आिण व्हिटामिन डी सारख्या जीवनसत्व- मिनरल कमी झाले. यामुळे डोळ्यांना मेंदूशी जोडणाऱ्या ऑप्टीक नर्वचे नुकसान झाले आणि दृष्टी गेली. 

बातम्या आणखी आहेत...