आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीईओंच्या कार्यालयासमोर संतप्त पालकांनी लावले बेशरमचे झाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर- तालुक्यातील लाडणापूर येथील नव्याने गठित झालेली शाळा व्यवस्थापन समिती मान्य नसल्यामुळे ती तत्काळ बरखास्त करावी,अशी मागणी पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे २७ डिसेंबर रोजी केली होती. परंतु या मागणीवर कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे संतप्त पालकांनी सोमवारी १४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेशरमचे झाड लावून निषेध केला. या सदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास दर पंधरा दिवसाला एक झाड लावण्यात येईल, असा इशारा पालक विजय हागे, प्रकाश बोदळे, बबलू इंगळे, गोपाल दुधमल, राहुल चावरे, विनोद निबोळकार आदी पालकांनी दिला आहे. 


  तालुक्यातील लाडणापूर येथील शाळा व्यवस्थापन समिती निवडीची प्रक्रिया ही पूर्वनियोजित असल्याचे पालकांच्या लक्षात येताच ५० पालकांनी मुख्याध्यापकांकडे विनंती अर्ज करून ही निवड प्रक्रिया थांबवण्यात यावी. तसेच रोस्टर काढून नियमानुसार निवड प्रक्रिया करण्याची मागणी केली होती. परंतु मुख्याध्यापकाने मनमानी करीत शाळा व्यवस्थापन समिती गठित केली. त्यावर पालकांनी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून ही समिती तातडीने बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु एकही अधिकारी शाळेमधे चौकशी करण्यासाठी आला नाही. विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देतात. त्यामुळे लाडणापूर येथील ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेशरमाचे झाड लावून निषेध केला. 

बातम्या आणखी आहेत...