आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदलाच्या विरोधात फ्रान्समध्ये २२० शहरांत ३.५ लाख लोकांचा मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस । हवामान बदलाच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी रविवारी फ्रान्समध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. देशातील २२० शहरांतील ३.५ लाखांहून जास्त लोक आंदोलनात सहभागी झाले होते. पॅरिसमध्ये ४५ हजार लोकांनी शांततेत मोर्चा काढला होता. त्यास मार्च ऑफ द सेंच्युरी असे नाव देण्यात आले आहे. निदर्शकांच्या हाती काही फलक होते. अब्जावधी रुपये कमावणारे लोक पर्यावरणासाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत. अशा लोकांना आमचा विरोध आहे, अशा आशयाचे फलक आंदोलकांच्या हाती होते. हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) परिणाम मानवाबरोबरच पृथ्वीवरील सर्वच प्राणिमात्रांवर होणार आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पॅरिस हवामान बदल कराराचे उद्दिष्ट गाठता आले पाहिजे.करारानुसार पृथ्वीच्या तापमानातील वृद्धी मर्यादित राहावी यासाठी निश्चित उद्दिष्टानुसार काम करणे अपेक्षित आहे. गत आठवड्यात हवामान बदलासंदर्भात जगभरात आतापर्यंत तीन वेळा निदर्शने झाली आहेत. नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये ११ मार्च राेजी ४० हजार लाेकांनी आंदाेलन केले होते. 


हे संकट जगासाठी संधी - १३ लाख कोटींचा बाजार उदयाला 
ग्लोबल वॉर्मिंगने जगभरात नवीन संधी निर्माण झाली आहे. कोळसा, डिझेल-पेट्रोलसारख्या पारंपरिक इंधनाला अक्षय ऊर्जेचा (अपारंपरिक) पर्याय वापरणे अिनवार्य केले आहे. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटनुसार २०२० पर्यंत सौरऊर्जा, पवनऊर्जेसारख्या विजेची १३ लाख कोटींची बाजारपेठ तयार होईल. 


वीज बचतीची उपकरणे, एलईडी बल्बची बाजारपेठ वार्षिक ४० टक्क्यांनी वाढत आहे. 
 

तंत्रज्ञानातून झाडांचे संवर्धन : झाडांच्या संवर्धनासाठी आेडिशात इको क्लब स्कूलची सुरुवात. व्यापक प्रमाणात ई-लर्निंग कार्यक्रमही सुरू. 'द ग्रीन फ्यूचर'या अमेरिकी संस्थेनुसार १ अब्ज रोपे लावली तर जगभरातील वृक्षांची संख्या १ टक्क्याने वाढेल. 


३० मार्चला अर्थ अवर : ३० मार्च रोजी अर्थ अवरचे आयोजन होईल. यंदाची संकल्पना वीज बचतीसह, हरित पृथ्वी अशी आहे. 


ग्रेटाला नोबेलसाठी नामांकन 
यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी पर्यावरण संरक्षक १६ वर्षीय ग्रेटा थनबर्नला नामांकन देण्यात आले आहे. तिने गतवर्षी ऑगस्टमध्ये हवामान बदलाच्या समस्येविरोधात शाळा सोडून स्वीडनच्या संसदेसमोर निदर्शने केली होती. त्यानंतर तीन खासदारांनी नोबेलसाठी प्रस्ताव मांडला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...