आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Gangapur, The Garland Of Absent Officer Chairs Is Wrapped In A Procession

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगापुरात गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना पुष्पहार घालून मिरवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - आठवड्याचा पहिला दिवस असूनही मुख्यालय दिनी देखील गैरहजर राहून ग्रामीण जनतेची पिळवणूक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता दोनशे पैकी १३२ कर्मचारी गैरहजर तर शहरातील एकूण १० शासकीय कार्यालयांपैकी  ९ कार्यालय प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास आले असून मनसेच्या तक्रारीवरून याप्रकरणी तहसीलदारांनी पंचनामे करून सर्वांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून गैरहजर अधिकाऱ्यांच्या ९ खुर्च्यांची मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून ढोल-ताशांच्या गजरात एका टेम्पोत सर्व खुर्च्या टाकून सवाद्य मिरवणूक काढून तहसील कार्यालयात जमा केल्या.    


शहरातील सर्वच कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना अनेकदा खेट्या माराव्या लागून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सोमवारी सकाळी तहसीलदार डा. अरुण जऱ्हाड यांच्याकडे सकाळी साडेदहा वाजता पंचनामा करण्यासाठी तक्रार करण्यात आली त्यावरून महसूलच्या पथकाने मनसे पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची सकाळी साडेदहा ते साडेबारा दरम्यान पाहणी केली असता कार्यालयांमधील विदारक सत्य बाहेर आले.