आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात मालकाने 'लाइव्ह दरोडा' पाहून केली पाेलिसांत तक्रार 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅथल- हरियाणातील कॅथलमध्ये राहणाऱ्या मंगलकुमार यांनी आपल्याच कारखान्यावर पडत असलेला दरोडा मोबाइलवर पाहिला आणि तत्काळ पोलिसांना कळवले. कारखान्याचे मालक व पोलिस पाच किमी अंतरावरील ग्योंग येथील कारखान्यात पोहोचेपर्यंत चोरटे एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, डाेंगल व रक्षकाजवळील माेबाइल लुटून फरार झाले होते.

 

मंगलकुमार म्हणाले, श्रीकृष्ण ओव्हरसीज नावाचा प्लास्टिक स्क्रॅपचा कारखाना आहे. कारखान्यात इंद्र नावाचा सुरक्षा रक्षक असतो. कारखान्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी अॅपने मोबाइलला जोडला आहे. १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अचानक त्यांनी मोबाइलवर कारखान्याची परिस्थिती पाहण्यासाठी तो चालू केला. तेव्हा ८ ते दहा बंदूकधारी गुंड सुरक्षा रक्षकास बांधून ठेवत होते. त्यांनी त्वरित पोलिस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...