आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्युशन घेण्यावरून सुरु झाली वादावादी, ऐन रस्त्यातच महिलांनी एकमेकींना लाथा, बुक्यांनी मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाथरस (उत्तर प्रदेश) : हाथरस जिल्ह्यातील हिरा का नगला या गावातील हा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. दोघीही एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारले, केसही ओढले. यादरम्यान कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला आहे. पोलिसांनी खटला दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. 

मुलांची ट्युशन घेण्यावरून दोन महिलांमध्ये हा वाद सुरु झाला. नंतर हा वाद इतका वाढला की, दोन्ही महिला रस्त्यातच एकमेकींना मारू लागल्या. त्यांना मारामारी करताना पाहून आपापल्या ओळखीच्या महिलेला वाचवण्यासाठी इतर महिलाही त्या मारहाणीत सामील झाल्या आणि त्यांनीही लाथा, बुक्क्यांचा मारा सुरु केला. एका महिलेने तर हाताच्या खुम्ब्याने मारायला सुरुवात केली. हे सर्व पाहून तिथे असलेल्या एका लहान मुलाने देखील संधी साधून महिलेला मारायला सुरुवात केली. हा प्रकार घडत आहे असे कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोनही महिलांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी दोघींनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही काही ऐकायला तयार नव्हते. मग पोलिसांनी लेखी तक्रार दाखल केली आणि दोन्ही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.     

बातम्या आणखी आहेत...