आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कथ्थी’च्या हिंदी रिमेकवर संशय, रणवीर-हृतिकचे नाव आले समोर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : पाच वर्षांपूर्वी रिलीज झालेला विजय स्टारर सुपरहिट तामिळ चित्रपट ‘कथ्थी’च्या हिंदी रिमेकवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरुगदॉसने केले आहे. आता दिग्दर्शक जगन शक्ती याचा हिंदी रिमेक बनवत आहेत. जगनने नुकतेच अक्षय कुमारसोबत  ‘मिशन मंगल’च्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. कथ्थीच्या रिमेकमध्येही तो अक्षयलाच घेणार असल्याची चर्चा आहे. अक्षयने स्क्रिप्ट ऐकली होती, मात्र आपल्या व्यग्र शेड्युलमूळे त्याने आतापर्यंत तो साइन केला नव्हता. नुकतेच एका मुलाखतीत त्याने संागिलते की, मेंटर मुरुगदॉस कलाकारांच्या निवडीवर काम करत आहेत. सूत्रानुसार, निर्माते आता या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि हृतिक रोशनच्या नावावर विचार करत  आहेत. मात्र याविषयी अजून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...