आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात अंगावर वीज कोसळ्याने 5 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने भवरखेडे (ता.धरणगाव) येथील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत चार जण एकाच कुटुंबातील होते. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता घडली. रघुनाथ दशरथ पाटील (६७), अलका रघुनाथ पाटील (६०), कल्पना श्यामकांत पाटील (३५), शोभा भागवत पाटील (५०) हे एकाच कु़टुंबातील चौघे व लता उदय पाटील (३५) अशी  मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

हे पाचही जण शेतात बाजरी कापत असतात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे ते शेतातील एका झाडाजवळ झोपडीत बसले असता विजांचा जोरदार कडकडाट झाला व वीज झोपडीवर कोसळली. त्यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. मृतदेह धरणगाव रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे भवरखेडेत  शोककळा पसरली.