आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीत औरंगाबाद जिल्ह्यात ४२१ गावे, १५१ वाड्यांना ५६५ टँकरने पाणीपुरवठा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मराठवाड्यातील टँकरची संख्या हजारावर गेली आहे. मराठवाड्यातील ७३५ गावांतील १५ लाख ७५ हजार ९८४ लोकांना ९५४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहीर अधिग्रहणांची संख्या १०२६ इतकी झाली आहे. मराठवाड्यात या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. मराठवाड्यातील धरणांत केवळ १५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात सध्या १०२६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३०३, औरंगाबाद २९३, जालना १८७ आणि लातूरमध्ये ५५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 


औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकर 
औरंगाबाद जिल्ह्यात ४२१ गावे १५१ वाड्यांना ५६५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ११० गावांतील १ लाख ८७ हजार लोकांना १२६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वैजापूर तालुक्यातील ७८ गावांतील १ लाख ३७ हजार ४२७ लोकांना १०८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सिल्लोड गावात ५३ गावांना ९५ टँकरने तर जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात ६८ गावांना ८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद तालुक्यात ५० गावांना ७६ टँकरने आणि फुलंब्री तालुक्यात २५ गावांना ३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 


बीड, जालना जिल्ह्यांत वाढली टंचाई 
औरंगाबादनंतर बीड आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई आहे. बीड जिल्ह्यात २०५ गावांत २४० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आष्टी तालुक्यात ५९ गावांना ६३, गेवराई ४१ गावांना ४५ टँकरने, तर शिरूर तालुक्यात २५ गावांना ३३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड तालुक्यातही ४९ गावांना ४१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातही ९८ गावांत १३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यात ३३ गावांत ४६ टँकर, जाफराबाद तालुक्यात ३२ गावांत ३६, बदनापूर तालुक्यात १० गावांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...