आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये प्रत्येक विदेशी पर्यटकाला करापोटी भरावे लागतील 630 रुपये 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- जपानमध्ये येणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाला ९ डॉलर (६३० रुपये) आंतरराष्ट्रीय पर्यटन कर भरावा लागणार आहे. हा कर दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पर्यटकाला भरावा लागणार आहे. यामुळे जपानला ३२ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या रकमेचा वापर पर्यटन इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी करण्यात येणार आहे. हा कर व्यवसायासाठी जपानमध्ये आलेल्यांवरही लागू हाेणार आहे. या कराची रक्कम विमान भाड्यातच वसूल केली जाणार आहे.

 

जपान अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला आर्थिक विकासाचे माध्यम मानत आला आहे. २०१८ मध्ये विक्रमी तीन कोटींपेक्षा जास्त पर्यटक जपानमध्ये आले होते. यामध्ये चीन, दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या आशियाई देशांतील पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. अलीकडच्या वर्षात विदेशी पर्यटक राजधानी टोकियो आणि प्राचीन शहर क्योटोच्या पुढे जाऊन देशातील विविध भागांत जाण्यास जास्त रुची दाखवत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...