आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Jharkhand Home Minister Amit Shah Said, 'Congress Has Problem With Citizenship Law

झारखंडमधील सभेतून गृहमंत्र्यांनी केले लक्ष्य, नागरिकत्व कायद्याबाबत काँग्रेसला पाेटदुखी : शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरिध : नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसला चांगली पाेटदुखी झाली असून ते या मुद्यावरून हिंसाचार पसरवू लागले आहेत, असा आराेप गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

या दुरुस्ती कायद्यातील तरतुदी ईशान्येतील लाेकांची संस्कृती, भाषा किंवा सामाजिक आेळख तसेच राजकीय अधिकारांचे कसल्याही प्रकारे उल्लंघन करत नाही. याची मी ग्वाही देताे. ईशान्येतील संस्कृतीला कसलाही धक्का लागू दिला जाणार नाही, याची जनतेने खात्री बाळगावी, असे त्यांनी सांगितले. मेघालयाचे मुख्यमंत्री काेनराड संगमा यांनी माझी या मुद्यावर भेट घेतली हाेती. मी त्यांनाही या मुद्यावर रचनात्मक पद्धतीने चर्चा करून मार्ग काढता येईल, असे सांगितले.

प्रचार थंडावला : झारखंडमध्ये चाैथ्या टप्प्यात १६ डिसेंबर राेजी पंधरा जागांसाठी मतदान हाेणार आहे. या टप्प्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी थंडावला. मधुपूर, देवघर, बगाेदर, जमुआ, गिरीडीह, बाेकाराे, डुमरी, चंदरक्यारी, सिंदरी, निरसा, धनबाद, झरिया इत्यादी पंधरा जागांसाठी मतदान हाेणार आहे. चाैथ्या टप्प्यात ४७ लाख ८५ हजारावर मतदार आपला हक्क बजावतील. निवडणुकीच्या रिंगणात २२१ उमेदवार अाहेत.
 

बातम्या आणखी आहेत...