आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Jodhpur, The Prosecution Of The Ownership Of The Cow, Cow Belongs To The Court;

जोधपूरमध्ये गाईच्या मालकी हक्कावरून वाद, गाईला केले न्यायालयात हजर; गाईने असा दिला न्याय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - राजस्थानात जोधपूरच्या एका स्थानिक न्यायालयात शनिवारी गाईलाच हजर करण्यात आले. तिला पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले. वकिलांनी सांगितले, हवालदार ओम प्रकाश व शिक्षक शामसिंह यांच्यात गाईच्या मालकी हक्कावरून गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरु होता. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना हवालदाराच्या बाजूने निर्णय दिला. कारण न्यायालयाने म्हटले, पुराव्याच्या आधारे गाय ओम प्रकाश यांना देण्यात यावी.कारण दोन महिन्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून दोन्ही दावेदारांच्या घरांपासून काही दूर अंतरावर गाईला खुले सोडण्यात आले. यानंतर गाय ओम प्रकाश यांच्या घराच्या दिशेने गेली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी गाय ओमप्रकाश यांच्या घरी जाण्यास मुख्य पुरावा मानला आणि त्यांनी गाय ओमप्रकाश यास देण्याचे आदेश दिले होते.