आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम जोंगच्या देशात १% लोकांकडेही नाही इंटरनेट, स्थानिक दुकानांतून डाऊनलोड करून घेतात अॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेहून ‘भास्कर’साठी विशेष
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सतत जगातील मोठ्या नेत्यांना भेटत आहेत. ते आपली आणि आपल्या देशाची प्रतिमा बदलत आहेत. पण त्यातही अपयशी ठरले. देशात संकट कायम आहे. आता तेथे भीषण दुष्काळ पडला आहे. तेथील लोक कोणत्या स्थितीत आहेत हे ‘भास्कर’ला सांगत आहेत कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक चार्ल्स आर्मस्ट्राँग.
 

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया आज एकमेकांपासून पूर्ण वेगळे आहेत. येथील लोकांची सुमारे एक हजार वर्षांपर्यंत एकसमान संस्कृती, भाषा आणि आचारविचार एकच होते. १९४८ मध्ये दोन्ही देश वेगळे झाले. दोन वर्षांनी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात युद्ध झाले. उत्तर कोरियाला चीनने तर दक्षिण कोरियाला अमेरिकेने साथ दिली. १९५० च्या दशकात दक्षिण कोरिया जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक होता. १९६० च्या दशकात उत्तर कोरिया दक्षिण कोरियापेक्षा वेगाने पुढे जात होता. पण १९९० च्या दशकापर्यंत दक्षिण कोरियाने आपला विकास दर जगातील सर्वाधिक विकास दर असलेल्या देशांएवढा केला. 


१९९६ मध्ये दक्षिण कोरिया आॅर्गनायझेशन आॅफ इकाॅनाॅमिक्स को-आॅपरेशन अँड डेव्हलपमेंटमध्ये दाखल झाला. ती जगातील सर्वात श्रीमंत देशांची संघटना आहे. त्याच वेळी उत्तर कोरियात भीषण दुष्काळ पडला तेव्हा तेथे १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. आज दक्षिण कोरियात ९५ टक्के लोकांजवळ स्मार्टफोन आहेत, तर उत्तर कोरियात फक्त १५% लोकांजवळच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, डेटा नसल्याने युजर्स अॅप वापरू शकत नाहीत. सरकारने मंजूर केलेल्या अॅप्स दुकानांत जाऊन डाऊनलोड करून घ्यावे लागतात. फ्रीडम हाऊस या संघटनेच्या टाॅप-१५ फ्री सोसायटीत दक्षिण कोरिया आहे, तर उत्तर कोरियाला अनेकदा खुला तुरुंग म्हटले जाते. तेथे ८० हजार ते १,२०,०० राजकीय कैदी आहेत.

 

असे आहे किम जोंग यांचे आयुष्य

किम यांच्याकडे ५ अब्ज डाॅलर असे आहेत, जे ते कधीही खर्च करू शकतात. संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, हा निधी त्यांनी नागरिकांवर खर्च करावा.
 

> दरवर्षी सुमारे ३ कोटी डाॅलरची दारू पितात. हेनेसी ब्रँड आवडीचा आहे.
> डेन्मार्कहून पोर्क (मांस), इराणहून मासे, चीनमधून खरबूज, जपानमधून बीफ येते.
> फ्रान्सची डिझायनर सिगारेट पितात. ईव्हज सेंट लाॅरेंट ब्रँडचे याचे एक पॅकेट ४४ डाॅलर आणि त्याचे लेदर कव्हर १६५ डाॅलरमध्ये मिळते.
> ३.५ कोटी डाॅलरचे स्की रिसाॅर्ट आहे. ८० लाख डाॅलरची याट आहे. २० हजारपेक्षा जास्त चित्रपटांचे कलेक्शन आणि खासगी चित्रपट आहेत. तीन डझनपेक्षा जास्त पियानो आहेत.
> ८.२ दशलक्ष डाॅलर किमतीच्या महाग घड्याळांचे कलेक्शन आहे. १०० कार आहेत. खासगी विमान आणि खासगी धावपट्टीही आहे.
> किम जोंग उन यांच्याकडे सुमारे १७ महाल आहेत.
 

उत्तर कोरियाच्या लोकांची स्थिती अशी 
> ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालानुसार २०१८ मध्ये येथे ४३.४ टक्के लोकसंख्या अल्पपोषित होती. २००० मध्ये हा आकडा ३७.५ टक्के होता.
> तेथील एक टक्क्यापेक्षाही कमी लोक इंटरनेट वापरतात. फक्त किम जोंग उन यांचे नजीकचे सहकारी आणि उच्च अधिकाऱ्यांनाच ही सुविधा आहे.
> देशात लोकल इंट्रानेट चालते. सर्व जण त्याचा वापर करतात. त्यात रेड स्टार नावाची उत्तर कोरियाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

 

मात्र हळूहळू बदलतोय उत्तर कोरिया

> सप्टेंबर २०१८ मध्ये पाच वर्षांच्या ब्रेकनंतर ‘मास गेम’चे आयोजन करण्यात आले. राजधानी प्योंगयोंगच्या बहुतांश इमारती ग्रे रंगाच्या होत्या. आता त्यांचा रंग ब्राइट आहे.
> गेल्या काही वर्षांत नवे शाॅपिंग माॅल, वाॅटर पार्क, कल्चरल सेंटर, स्पोर्ट्स सेंटर तयार झाले. देशात ग्राहक संस्कृती यावी हा हेतू.
> एक वर्षात माइरे सायंटीस्ट स्ट्रीट तयार झाला. तेथे ५३ मजली इमारत आणि २५०० अपार्टमेंट तयार करण्यात आले. तेथे देशातील मोठे वैज्ञानिक राहतात. तेथे टेनिस कोर्ट, शाॅपिंग सेंटरही आहे.
> प्योंगयोंग आणि वाॅनसेनसारख्या शहरात नवे विमानतळ अत्यंत आधुनिक शैलीत बनवले आहेत. तेथे करमुक्त दुकाने आणि चांगले रेस्तराँ उघडण्यात आले.
> २०२० पर्यंत २० लाख पर्यटकांना उत्तर कोरियात येण्यासाठी आकर्षित करण्याची तेथील सरकारची इच्छा आहे. तेथे विंटर रिसाॅर्ट, पंचतारांकित हाॅटेल, पांढरे समुद्रकिनारे तयार केले जाताहेत.
> मे २०१८ मध्ये उत्तर कोरियाने आपला टाइम झोन बदलला. त्याने आपले घड्याळ अर्धा तास पुढे नेऊन दक्षिण कोरिया आणि जपानच्या वेळेसोबत आणले.
> मनोरंजन आधी मोठ्या आणि श्रीमंत लोकांपर्यंतच मर्यादित होते, पण २०१२ मध्ये सुरू झालेला मोरॅनबाँग बँड आता देश-विदेशात फिरत आहे.