आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखमध्ये पारा उणे 25 अंशांवर, श्रीनगरमध्ये विमान उड्डाणे बंद; दक्षिणतेही थंडीचा कडाका वाढणार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ श्रीनगर : पर्वतराजीत होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर आणि पूर्व भारतात कडाक्याची थंडी पडली असून हा कडाका वाढत चालला आहे. शनिवारी लडाख आणि कारगिलमधील द्रासमध्ये सर्वात कमी तापमान नोंदले गेले. तेथे पारा उणे २५.५ अंशांवर आला आहे. तर, लेहमध्ये पारा उणे १५.९ अंशांवर होता. जम्मू-काश्मीरमध्ये बहुतांश भागांत थंड वारे आणि घसरलेल्या तापमानामुळे नळ तसेच तलावांत पाणी गोठले आहे. राज्यात सर्वत्र दाट धुक्याचे साम्राज्य होते. याचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारपासून शनिवारी सकाळपर्यंत उड्डाणे पूर्णपणे बंद होती. गेल्या २४ तासांत २७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, श्रीनगर-जम्मू महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात थंडी प्रचंड वाढली असून १० डिसेंबरपासून या राज्यात हिमवृष्टी सुरू होईल. उत्तर भारतातील ही थंडीची लाट मध्य व दक्षिण भारतातही काही दिवसांत पसरेल. शुक्रवारपासूनच तामिळनाडूच्या काही भागांत पाऊस पडला असून यामुळे थंडी वाढणार आहे.
द्रासमधील छायाचित्र.
 

बातम्या आणखी आहेत...