आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Last Year, 44 Farmers Committed Suicide In Morshi Taluka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोर्शी तालुक्यात मागील वर्षभरात 44 शेतकऱ्यानी केल्या आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी- तालुक्यात विविध कारणांमुळे सरत्या वर्षात ४४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, यात नऊ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

 

अनियमित पाऊस, उत्पादनात घट, बाजारात शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव आदी विविध कारणांमुळे आलेला आर्थिक तणाव व कौंटुंबिक समस्यांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती संपलेली नसल्यामुळे ग्रामीण भागातील चित्र विदारक झाले आहे. त्यामुळे परिस्थितीसमोर हतबल होऊन मागील वर्षात तालुक्यात ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले. यात नऊ गृहलक्ष्मींचाही समावेश आहे. जानेवारी २०१८ मध्ये विलास किसनराव ठाकरे (विष्णोरा), राजेश रामदास म्हाला (आष्टगाव),विठ्ठल जोतीराम पांडे (नेरपिंगळाई), तुळशीराम यशवंत ढेवले (बऱ्हाणपूर), ईश्वर सुभाष नानोटकर (नेरपिंगळाई), शितल अरुण सनेसर निंभी), फेब्रुवारीत विठ्ठल शंकर मानकर (डोंगरयावली), अरुण वामन गुडधे ( डोंगरयावली), रोशनी गजानन राऊत ( पाळा), मार्चमध्ये शेख अयुब शे.गुलाब (हिवरखेड), हरिष नामदेव परोटकर ( हिवरखेड), सुशिला रुपराव बन्सोड (अडगाव), अशोक महादेव खिरडकर (अडगाव), एप्रिलमध्ये संदीप रमेश पवार (अंबाडा), मेमध्ये भरत देविदास ठाकूर (विष्णोरा), जूनमध्ये विलास कृष्णदेव चरपे (निंभी), छंगान मनिष प्रभाकर म्हाला (उदखेड), जुलै मध्ये पंकज विकास मोंढे (रा. पार्डी), अनिता नीलेश नांदुरकर (रिद्धपूर), मधुकर नत्थू आकोलकर (आष्टगाव), श्रीकृष्ण बापूराव जामठे (रिद्धपूर), ऑगस्टमध्ये भीमराव सुखदेव कांबळे (पिंपळखुटा मोठा), वेणूबाई श्रीपत टेकाम (पिंपळखुटा खुटा लहान), संजय सर्जराव पाटील (विष्णोरा), विजय नागोराव लुंगे ( खानापूर), ज्योती सुधीरराव चोधरी (खोपडा), सप्टेंबरमध्ये अरुण दोलतराम डांगे (अंबाडा), कुंदन रामराव पाटील (हिवरखेड), देविदास मधुकर काळे (उदखेड), सुरेश शामराव नागले (पिंपळखुटा मोठा), ऑक्टोबरमध्ये मंगेश नारायण पडोळे (निंभी), तुषार गुलाबराव मरस्कोले (लाखारा), राखी संजय तेटू (उदखेड), कमलेश राजेंद्र निधान (आष्टोली), मनोहर नामदेवराव टेकाडे (ब्राम्हणवाडा), अमोल वासुदेव मांडूळकर (पिंपळखुटा), नोव्हेंबरमध्ये गोपाल उत्तराजी डाखोरे (तरोडा) सुभाष धनराज डहारे (पिंपरी), विष्णुपंत निळकंठ चिकटे (तळेगाव), उषा गजानन पांडे (खानापूर), प्रियंका राहुल खडसे (गोराळा), डिसेंबरमध्ये पंजाब महादेव मरकाम (लाखारा), गजानन श्रीरंग राऊत (भाईपूर) , कौसाबाई श्यामराव नेहारे (हिवरखेड,ता. मोर्शी ) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.