आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात काँग्रेसजन म्हणतात १९९९ ची तर भाजप म्हणते १९९५ पुनरावृत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहरात काँग्रेस आणि भाजप-वंचित आघाडीच्या प्रचारात एकाच गोष्टीची चर्चा असते. काँग्रेसच्या प्रचारसभेतला प्रत्येक वक्ता म्हणत असतो की शहरात काँग्रेसचे वादळ असून १९९९ ची पुनरावृत्ती होणार आहेत. भाजपा आणि वंचित बहुनज आघाडीचे नेते-कार्यकर्ते मात्र सांगतात की शहरात काँग्रेस पुरती खिळखिळी झाली असून लातूरकरांना गृहीत धरण्याच्या बेदरकार वृत्तीमुळे लातूरमध्ये १९९५ ची पुनरावृत्ती होणार आहे. मात्र दोन वेगवेगळ्या सालच्या या पुनरावृत्त्या नेमक्या काय आहेत हे समजल्याशिवाय त्यामागचा मतितार्थ कळणार नाही.
विलासराव देशमुख महसूलमंत्री असताना त्यांचे लातूरकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या भोवतालच्या कोंडाळ्याच्या कारनाम्यांमुळे १९९५ सालच्या विधानसभा निवडणूकीत लातूरकरांनी विलासरावांचा पराभव केला. त्यावेळी विलासरावांना आपल्या विरोधातील वातावारणाचा अंदाज आला नव्हता. लातूरकरांना त्यांनी गृहीत धरल्यामुळे त्यांच्या विरोधात रोष  होता.  अगदी तसेच वातावरण यंदाच्या निवडणुकीत असल्याचे भाजप आणि वंचितच्या सभांमधून सांगितले जाते.

दुसरीकडे १९९५ साली पराभूत झालेल्या विलासरावांनी साडेचार वर्षात लोकांत राहून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. लातूरकरांच्या सुखदुखात ते सामील व्हायला लागले. त्यामुळे नेमका कोणत्या बाबतीत रोष होता हे ओळखून त्यांनी त्याचा राजकीय ईलाज केल्याने १९९९ सालच्या निवडणूकीत त्यांचा ८० हजारांहून अधिक मतांनी विजय झाला. लातूरमधील काँग्रेसची सध्याची मंडळी केवळ १९९९ ला ज्या पद्धतीने त्यावेळेसच्या सेना-भाजपच्या विरोधात लोकांचा रोष होता आणि काँग्रेसच्या बाजूने जनमत होते असे सांगत असते. काँग्रेसच्या प्रचारसभात हाच मुद्दा असतो.