आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Laws Forcefully Turns Their Muslim Son In Law Shahjad In A Hindu With Name Sandip

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सततच्या टोमण्यांना कंटाळून मुस्लीम युवक बनला हिंदु, जेव्हाही पत्नीला भेटायला जायचा, सगळे करायचे कमेंट...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत(उत्तर प्रदेश)- सिंघावली अहिर परिसरात एक मुस्लिम युवकाने बुधवारी विधिवत शिव मंदिरात पुजा अर्चना करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. पुजेनंतर शहजाद नाव बदलून तो संदीप बनला आहे. युवकाने सांगितले की, त्याने हे पाऊन सासरकडच्या लोकांकडून सतत मिळणाऱ्या टोमण्यांन त्रस्त होऊन उचलले आहे. त्याच्या सासरचे लोक त्याला मुस्लीम धर्मातील कलंक म्हणायचे.


लग्नाच्या काही महिन्यानंतर बायको माहेरी गेली
शहजादपासून संदीप बनलेला युवक तितरोदा गावात डॉक्टर आहे. त्याचे 8 वर्षांपूर्वी शबाना नावाच्या मुलीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यानंतर त्याची बायको त्याला सोडून गेली. जेव्हा पण तो सासरी त्याच्या बायकाला भेटायला जायचा तेव्हा त्याच्या नमाज न पडण्यावर त्याला तु मुस्लीम धर्मावर कलंक आहेस असे टोमणे मिळायचे. सासरकडच्या लोकांकडून मिळणाऱ्या टोमण्यांमुळे शहजाद डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने एक वेळा तर आत्महत्येचा विचारही केला होता पण त्यानंतर त्याने आत्महत्या न करता धर्म बदलला.


पोलिसांसमोर झाले सगळे
बुधवारी काही गावकऱ्यांसोबत शहजादने शिव मंदिरात पुजा करून हिंदु धर्म स्वीकरला आणि नाव संदिप ठेवले. धर्म परिवर्तनाची सुचना पोलिसांनाही दिली होती. पोलिसांनी युवकावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे सांगितले.