आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Madhya Pradesh The Second Of World And The First Military Museum Of Country, Starting Soon

मध्य प्रदेशात जगातील दुसरे व देशातील पहिले लष्करी संग्रहालय, लवकरच सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भिंतीवरून उड्या घेताना व डोंगरावर शत्रूशी लढताना सैनिक - Divya Marathi
भिंतीवरून उड्या घेताना व डोंगरावर शत्रूशी लढताना सैनिक
  • दोन एकरांत संग्रहालय, तीन मजली इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण
  • छायाचित्रे, पुतळ्याद्वारे शौर्य व बलिदानाचा इतिहास दर्शवणार

प्रणय जैन 

महू - मध्य प्रदेशातील इंदूरच्या महू येथे देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय साकारत आहे. यात लष्कराचा १७४७ पासून २०२० पर्यंतचा गौरवशाली इतिहास, शौर्यकथा व शूर सैनिकांचे बलिदान थ्रीडी प्रिंटर व घडवलेले पण सजीव वाटणारे पुतळे, म्यूरल्स व फोटो गॅलरीद्वारे दाखवण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या वर्षी  लोकांसाठी तो सुरू करण्याची लष्कराची तयारी आहे. सुमारे दोन एकरात हे संग्रहालय उभे राहात आहे. तीन मजली संग्रहालय असून तीन टप्प्यात काम सुरू आहे. यात पहिल्या टप्प्याचे काम होत आले आहे. येथे १७५७ मध्ये प्लासीची लढाई, बॅटेल  ऑफ सारागढी, बॅटल आॅफ बक्सर, भारत-पाक युद्ध १९६५- १९७१, सोबत छत्रपती शिवाजी महाराज व  सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास येथे साकारला आहे. 
संग्रहालयाचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले. येथे युद्ध लढताना, ४० फूट उंच भिंतीवर उडी घेताना व घरात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडताना सैनिकांचे पुतळे आहेत. संग्रहालय पाहण्यासाठी लोकांना ऑनलाइन बुकिंग करता येईल. दिवसातून १०० लोकांना येथे भेट देता येते. एका व्यक्तीस संग्रहालय पाहण्यास कमीत कमी अडीच तास लागतील. लोकांना ४० -४० च्या गटाने संग्रहालय दाखविण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...