आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Malaysia A Man Get Punishment Of 34 Months In Jail And Fined Rs 7 Lac, Due To Murder Of A Cat

मलेशियामध्ये मांजरीच्या हत्येतील दोषीला 34 महिन्यांचा तुरुंगवास, 7 लाख रुपयांचा दंड लागला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियाच्या सेलायंग सत्र न्यायालयाने मंगळवारी ड्रायरमध्ये टाकून गर्भवती मांजरीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 34 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच 9700 डॉलर (सुमारे 7 लाख रुपये) चा दंडदेखील लागला आहे. कोर्ट म्हणाले, "दंड ना भरल्यास आणखी 4 महिने त्याला तुरुंगात राहावे लागेल. "मलेशियाची सरकारी न्यूज एजन्सी बर्नामाने सांगितले की, कोर्टाने के. गणेश नावाच्या व्यक्तीला पशु संरक्षण कायदा मोडल्यामुळे दोषी ठरवले आहे.   न्यायाधीश रासिहाह गजाली म्हणाले, "आशा आहे की, दोषीला मिळालेली ही शिक्षा लोकांसाठी एक शिकवण ठरेल. यामुळे लोकांना मुक्या प्राण्यांसोबत क्रूरता न करण्याचा धडा मिळेल." मात्र गणेशने स्थानिक कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध उच्च‍ न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या उच्च‍ न्यायालयात जाण्याच्या अपीलमुले त्याला सध्या जामीनावर मुक्त केले गेले आहे. 

महिलेला ड्रायरमध्ये मिळाला मांजरीचा मृतदेह... 
एका सीसीटीवी फुटेजद्वारे मांजरीच्या हत्येचा खुलासा झाला. फुटेजमध्ये व्यक्ती मांजरीला ड्रायरमध्ये टाकताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, या घटनेची माहिती सर्वात आधी एका महिलेला मिळाली. महिलेने जेव्हा ड्रायरचा वापर केला तेव्हा तिला त्यामध्ये एका प्राण्याचा मृतदेह दिसला. त्यानंतर तिने याची माहिती पोलिसांना दिली. 

बातम्या आणखी आहेत...