आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात ६३९ घरांची पडझड, ८५ जनावरे, ७८८ शेळ्या ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - तालुक्यात शुक्रवारी (दि.१) रात्रभर व शनिवारी पहाटे पर्यंत झालेल्या पावसाने शेतकरी व शेती व्यवसायाचे भीषण नुकसान झाले. तालुक्यात ६३९ घरांची पडझड झाली. गाय, बैल, म्हशी अशी ८५ माेठी जनावरे दगावली.  ७८८ शेळ्या, मेंढ्या ठार झाल्या. नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नुकसानीचे पंचनामे सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

परतीच्या पावसाने सौंदाणे, साकोरी, पाथर्डी, निमगुले, जेऊर, निमगाव या गावांमध्ये हाहाकार उडाला आहे.एकट्या निमगाव मध्ये ७२ माेठी जनावरे दगावली आहेत. अनेक गावांच्या खळवाड्यांमधील बैल गाड्या वाहून गेल्या आहेत. गाेठ्यात बांधलेली जनावरे नदी व नाल्यांच्या पुरात वाहून गेली. पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहने देखील बेपत्ता झाली आहेत. तहसील विभागाकडून याची सविस्तर अकाडेवारी संकलित केली जात आहे.शनिवारी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत,  प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी मालेगाव शहर व सौंदाणे येथील नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी  मळगाव, पाथर्डी, निमगुले, जेऊर, साकोरी, निमगाव, मेहुणे व सौंदाणे या गावांना भेटी देऊन मंडळ अधिकारी तसेच तलाठींना नुकसान पंचनामे करण्याविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या भेटी देऊन दिलासा दिला. शनिवारी दिवसभर व सांयकाळी उशिरा पर्यंत नुकसानीचे पंचनामे सुरू होते. अनेक गाव व मंडळांची नुकसानीची आकडेवारी तसेच अहवाल तालुका तहसील मुख्यालयाला प्राप्त झालेले नाहीत.