आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात "हम सात साथ है' : खैरे, चव्हाण पराभूत! प्रीतमनी मोडला गोपीनाथरावांचा रेकॉर्ड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  लोकसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस, राष्ट्रवादीला जबर धक्का देणारे ठरले अाहेत. मराठवाड्यात या वेळी काँग्रेसला भाेपळाही फाेडता आला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसही चारही मुंड्या चित झाली. मराठवाड्यातील आठपैकी ७ जागा महायुतीने जिंकल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून अशाेक चव्हाण आणि हिंगाेलीतून राजीव सातव यांनी निवडून येत लाज राखली हाेती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले चव्हाणही पराभूत झाले. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची परंपरागत मते खाऊन वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीला विजयापासून वंचित ठेवले. नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), हिंगोलीतून  हेमंत पाटील (शिवसेना), परभणीतून संजय जाधव (शिवसेना), जालन्यातून रावसाहेब दानवे (भाजप), औरंगाबादमधून आ. इम्तियाज जलील (एमआयएम), बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे (भाजप), लातूरमधून सुधाकर शृंगारे (भाजप) तर उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर (शिवसेना) विजयी झाले.
 

भाजप : ४, शिवसेना : ३, वंचित : १

 

बीड : बाप से बेटी सवाई... प्रीतमनी मोडला गोपीनाथरावांचा रेकॉर्ड

>लोकनेते गोपीेनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबातून पुढे येत २०१४ च्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांनी ९ लाख २२ हजार ४१६ मताने विजय मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षाही अधिक मते घेऊन  रेकॉर्ड केला. प्रीतम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा १ लाख ७७ हजार मतांनी पराभव केला आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात डॉ. प्रीतम यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे .यंदाच्या निवडणुकीत डॉ. प्रीतम यांनी वडील गाेपीनाथ मुंडे यांचे २००९ व २०१४ च्या लीडपेक्षा जास्त मते घेऊन लोकसभेच्या  निवडणुकीत आपण कसे यशस्वी आहोत, हे  पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. 


२०१४ च्या बीड लोकसभा निवडणुकीत  भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सुरेश धस यांचा १ लाख ३५ हजार ४५४ मताने  पराभव केला होता.  मुंडे यांना ६ लाख ३५ हजार ९९५ मते तर  धस यांना ४ लाख ९९ हजार ५४१ मते मिळाली होती.

 

प्रीतम मुंडेंनी रचला होता इतिहास
पोट निवडणुकीत  प्रीतम मुंडे  यांनी  काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांचा चक्क  ९ लाख २२ हजार ४१६ मतांनी पराभव  करत इतिहास रचला होता. 

 

मराठवाड्यातील इतर जागांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......

बातम्या आणखी आहेत...