आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोमध्ये ७० विविध घटनांत २१ लाखांच्या मोबाइलची लूट, लोकांनी सावधानी म्हणून नकली मोबाइलचा सुरू केला वापर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - मेक्सिकोमध्ये एका महिन्यात ७० चाेरीच्या घटना घडल्या. या घटनांत चोरट्यांनी सुमारे २१ लाख रुपये किंमतीचे फोन लुटले. माेबाइल चाेरीस जाऊ नयेत म्हणून लोकांनी खऱ्या मोबाइलप्रमाणेच दिसणारे डमी फोन जवळ बाळगण्यास सुरूवात केली आहे. चोरट्यांना उल्ल्ू बनविण्याचा हा योग्य मार्ग आहे, असे लोकांना वाटते. मोबाइल हिसकावून घेतल्यानंतर ते खुश होतील आपले प्राणही वाचतील, असे त्यांना वाटते. चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी बस आणि रस्त्यांवर सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात आले आहेत. एका वृत्तानुसार, मेक्सिकोमध्ये सशस्त्र दरोडेखाेरांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेत मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, फक्त जानेवारी २०१९ मध्ये राजधानीचे शहर मेक्सिको सिटीमध्ये दरोडे, लुटीची ७० हिंसक प्रकरणे घडली आहेत.  बहुतांश प्रकरणे रस्त्यावरून पायी चालणाऱ्या  लोकांना लक्ष्य करण्यात आले. तर अन्य प्रकरणात वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना व बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  या चोरीचा फटका बसला आहे. अशा चोरींच्या घटनांत वाढ होते आहे. अशा चाेऱ्या रोखण्यासाठीच लोक डमी फोन विकत घेत आहेत. याची किंमत १००० ते १७०० रुपये इतकीच आहे. याची डिझाइन व लूक ब्रँडेड फोनसारखाच आहे. 

 

लाेकांनी म्हटले, फोन चोरीस जाण्यापेक्षा आमचा डाटा महत्त्वाचा आहे
मेक्सिकोमध्ये होणाऱ्या घटनांवरून फोनपेक्षा आमचा डाटा महत्वाचा आहे, असे लोकांनी सांगितले. फोनमध्ये बँकिंग कार्डाचे क्रमांक व पासवर्ड असतात. यामुळे हा फोन महत्वाचा वाटतो. मेक्सिकोमध्ये गेल्या दहा वर्षांपासून डमी फोन उपलब्ध आहेत. परंतु याचे चलन गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या घटनांनंतर वेगाने वाढले आहेत, असे लोकांनी सांगितले.