आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्रीनंतरच्या धाडीत पुन्हा अवैध वाळू साठा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला- मध्यरात्रीनंतर धाड घालून पुन्हा अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान एक ट्रॅक्टरही जप्त करण्यात आला असून जप्त झालेले वाहन आणि वाळूसाठ्यासाठी संबंधित आरोपीला सव्वा लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

 
जिल्हा कचेरीतील नोंदीनुसार दोनवाडा येथे मध्यरात्रीनंतर पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी हेमंत दोड यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आणि त्यामध्ये अवैधपणे वाहून नेला जाणारा वाळूसाठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जिल्हास्तरीय आकस्मिक धाड व तपासणी पथकाने दोनवाडा येथे कारवाई केली. ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच-३०, जे २३२९ असून मालक हेमंत दोड रा. शिवर हे आहेत. गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक करू नये 
या प्रकरणात १ लाख १५ हजार ८३३ रुपयांचा दंड वसूल केला जाणार असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. त्यामुळे यापुढे कुणीही गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करू नये, असे आवाहन पथकप्रमुखांनी केले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...