दिव्य मराठी विशेष / खबरदार ! रूळ ओलांडाल तर ‘यम’च उचलेल! वाढत्या रेल्वे अपघातावर पश्चिम रेल्वेची अनोखी योजना

यमाचा वेश केलेला व्यक्ती एकाला उचलून नेताना. यमाचा वेश केलेला व्यक्ती एकाला उचलून नेताना.

मुंबई पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस दलाच्या विद्यमाने राबवण्यात येत आहे जागृकता मोहीम

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 08:47:57 AM IST

मुंबई - मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर गाडी पकडण्यासाठी पुलावरून जाण्याऐवजी बिनधास्त रूळ ओलांडले जातात. यामुळे प्रत्येक वर्षी शेकड्यांनी मृत्युमुखी पडतात. प्रवाशांनी रुळ ओलांडू नये म्हणून रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करते तरीही प्रवाशी रूळ ओलांडतच असतात. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अनोखी योजना राबवत रूळ ओलांडाल तर यम तुम्हाला उचलेल हे दाखवणारे प्रात्यक्षिकच रेल्वे स्थानकात सुरू केले आहे. यात यमाचे कपडे घातलेली व्यक्ती रुळ ओलांडणाऱ्याला उचलते आणि प्लॅटफॉर्मवर घेऊन येते. यामुळे तरी रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या कमी होईल, असे रेल्वेला वाटत आहे.
सूचना प्रणाली केंद्राच्या (क्रिस) इंटिग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टिम (आयसीएमएस) अहवालानुसार, रूळ ओलांडणी, धावत्या ट्रेनमधून पडणे, रुळांलगत असलेल्या पोलवर आदळणे यांमुळे मृत्यू वा जखमी झालेल्या प्रवाशांच्या संख्येत यंदा सुमारे २० टक्के घट झाली आहे. २०१८मध्ये या कारणांमुळे ११४२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर २०१९ मध्ये हाच आकडा ९१२ पर्यंत खालावला आहे. जखमींच्या संख्येत ही १६ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अशा अपघातांमध्ये ७१८ प्रवासी जखमी झाले असून गतवर्षी ८५५ प्रवासी जखमी झाले होते.


रेल्वे पोलिस, सोशल मीडियासह पारंपरिक पद्धतीने प्रवाशांमध्ये जनजागृती नेहमीच केली जाते. यामुळे यावर्षी सप्टेंबरपर्यंत रुळांवरील अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सर्वाधिक रूळ ओलांडणी होणा-या १३९ जागा निश्चित केल्या असून यापैकी १२३ ठिकाणी सुरक्षा भिंत आणि सुरक्षा जाळी उभारण्यात आली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

X
यमाचा वेश केलेला व्यक्ती एकाला उचलून नेताना.यमाचा वेश केलेला व्यक्ती एकाला उचलून नेताना.
COMMENT