आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराेडपती बाप्पा : मुंबईत लाडक्या गणरायाला यंदा २५ काेटींचे दागिने-साज, ३०० काेटी रुपयांहून जास्तीचा विमा, दानासाठी तर २०२८ पर्यंतची प्रतीक्षा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - मुंबईचा गणेशाेत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पासाठी भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. मुसळधार पाऊस असतानाही गणेशाेत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. दरराेज हजाराे भक्तांची गर्दी पाहायला मिळते. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाच्या मूर्तीला बनवण्यासाठी दान देणाऱ्यांना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत आहे. त्यांना २०२८ पर्यंतच्या मूर्ती बनवण्यासाठी दान देणाऱ्यांची आगाऊ नाेंदणी झाली आहे. यंदा बाप्पाला माैल्यवान दागदागिने परिधान करण्यात आले आहेत. गणपतीला २५ काेटी रुपयांच्या दागिन्यांचा साज करण्यात आला आहे. या सर्व गणेश मंडळाच्या मंडपांचा एकूण ३०० काेटी रुपयांहून जास्त रुपयांचा विमाही उतरवण्यात आला आहे. मुंबईतील यंदाच्या चर्चित गणेश मंडळ व मंडपांबद्दल जाणून घेऊया.... 
 

जीएसबी गणपती
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून परिचित. गाैड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाची १९५१ ला स्थापना झाली हाेती. यंदाच्या वर्षी मंडळाच्या मंडपाचे क्षेत्रफळ ७० हजार चाैरस फूट आहे. गणेशाला सुमारे २०२ काेटींचे साेने-चांदी, हिरे व इतर माैल्यवान दागिन्यांनी सजवले आहे. सुरक्षा व निगराणीसाठी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय ४५०० सुरक्षा रक्षकांसह मंडळाचे कार्यकर्तेही तैनात आहेत. पर्यावरणाचा विचार करून प्लास्टिक क्रशर लावले आहेत. 
वैशिष्ट्ये : शाडूपासूनची मूर्ती 
उंची :  १४ फूट 
मंडपाचे क्षेत्रफळ : ७२ हजार ते ७५ हजार चाै. फूट 
विमा : २६५ काेटी रुपये 
 

लालबागचा राजाला गेल्या वर्षी १३ काेटींच्या भेटी
लालबागचा राजा - मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणराय. सर्वाधिक दानही या मंडळाला मिळते. गेल्या वर्षी सुमारे १३ काेटी रुपये मिळाले हाेते. दान रूपाने मिळालेले साेने-चांदी व इतर धातूंच्या लिलावातून मंडळाला १ काेटी ५८ लाख रुपये मिळाले हाेते. 

वैशिष्ट्ये : मूर्ती दरवर्षी सारखीच असते.  खर्च : १ लाख रुपये. उंची-१२ फूट. मंडपाचे क्षेत्रफळ : सुमारे २ हजार चाैरस फूट. २४ कॅरेट साेन्याचे दागिने. विमा : २५ काेटी. 
 

अंधेरीचा राजा
येथे दान देऊ इच्छिणाऱ्यांना २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. यंदा बाप्पाला २ काेटी रुपयांचे साेन्याचे दागिने परिधान केले.

वैशिष्ट्ये : मूर्तीला ट्रेड मार्क आहे. उंची : ९ फूट, क्षेत्रफळ : ५ हजार चाै. फूट विमा : ५.२५ काेटी रुपये. 
 

खेतवाडीचा राजा 
१९५९ मध्ये स्थापन झालेला गणपतीही सर्वांचे आकर्षण ठरताे. यंदा महाकालेश्वराच्या मंदिराची प्रतिकृती . 

वैशिष्ट्ये : मूर्ती शंकराच्या रूपात साकारले. खर्च : ४ लाख रुपये. उंची : २४ फूट क्षेत्रफळ : १८०० चाै. फूट 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...