आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती सोडा-सोडा म्हणत होती, पण कुणीच ऐकले नाही, हात पिरगाळून, केस ओढून विचारले 'सांग, तू आणखी काय चोरलंस...'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर (महाराष्ट्र) - नागपुरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका दुकानात मुलीला चोरी करताना पकडल्यावर लोकांनी तिच्याशी अभद्र व्यवहार केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. लोकांच्या म्हणणे आहे की, या तरुणीसोबत व्हिडिओमध्ये जे कोणी दिसत आहेत, त्यांच्याविरुद्धही केस दाखल झाली पाहिजे.

 

शहराच्या जरिपटका परिसरात एका कापड दुकानात तरुणीला चोरी करताना पकडण्यात आले. यानंतर लोकांनी महिला पोलिसांना न बोलावता तरुणीला पकडून अभद्र वर्तन केले. व्हिडिओत काही जण मुलीचे केस ओढताना दिसत आहेत, तर काही जण तिला शिवीगाळ करताना दिसत आहेत. तर काही जण संधी साधून तिच्या शरीराला इथेतिथे हात लावत आहेत. या तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी पुरुषांनी स्वत:च तिची चेकिंग केली. व्हिडिओमध्ये ही मुलगी सारखी सोडा-सोडा म्हणत विनवणी करताना दिसत आहे.

 

शुक्रवारी संध्याकाळी दुकानावर कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने ही तरुणी आली आणि लपून ती कपडे सोबत नेऊ लागली होती. परंतु दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरा पाहून तरुणीला पकडले. यानंतर तेथे तमाशा सुरू झाला, लोकांची भलीमोठी गर्दी जमली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस म्हणताहेत की, दुकानदारानेही चुकीचे वर्तन केले आहे, त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल होईल.

 

बातम्या आणखी आहेत...