आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात ७० वर्षीय वृद्धाने केली साठवर्षीय ५ व्या पत्नीची हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सत्तरवर्षीय वृद्धाने आपल्या पाचव्या ६० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे घडली. सोमवारी हा प्रकार निदर्शनास आला. हत्येनंतर वृद्धाने पत्नीचा मृतदेह भगूर-पांढुर्ली रस्त्याच्या कडेला टाकून अपघात दर्शविण्याचा प्रयत्न केला. हिराबाई नामदेव भोर (६०) असे मृत  महिलेचे नाव असून सिन्नर पोलिसांनी पती नामदेव राजाराम भोर (७०) यास अटक केली.   मृत पत्नीपासून झालेला मुलगा समाधान (३५) याने सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली असून आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी शिवीगाळ आणि मारझोड करणाऱ्या बापानेच आईचा घात केल्याचे म्हटले आहे. भोर मळ्यात वास्तव्यास असलेला नामदेव सोमवारी सकाळी रस्त्यावरून घर आणि घरापासून रस्त्यावर फिरत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.  त्यांनी पाहणी केली असता हिराबाईचा मृतदेह रस्त्यावर दिसला.  त्यानंतर त्यांनी समाधान याला माहिती दिली. त्याने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.
 

भांडखोर हीच नामदेवची ओळख
नामदेवने आजवर पाच विवाह केले असून हिराबाई या पाचव्या पत्नीपासून त्याला दोन मुली आणि १ मुलगा आहे. मुली विवाहित असून मुलगा समाधान त्यांंच्याजवळ राहायचा. मात्र, १४ सप्टेंबरपासून कामानिमित्त तो बाहेरगावी होता.  त्याचे भावकीत त्याचे जमिनीचे वाद आहेत. आजूबाजूच्या लोकांशी नामदेवचे पटत नव्हते. सकाळी ७ वाजताच जेवणाची सवय असल्याने उशिरा स्वयंपाक झाल्यास तो पत्नीला शिवीगाळ, मारझोड करायचा. हिराबाई शेतातील कामासाठी आलेल्या मजुरांशी बोलल्या तरी तो चारित्र्यावर संशय घेत मारहाण करायचा, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.