आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक 24 लाख कोटींवर; गुंतवणुकीत आठ टक्क्यांची वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात एकूण ४२ म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम आॅक्टोबरमध्ये २२.२३ लाख कोटी रुपये होती, जी नोव्हेंबरमध्ये वाढून २४.०२ लाख कोटींवर पोहोचली आहे. 

 

सर्वाधिक १.३६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लिक्विड योजनांमध्ये झाली आहे. लिक्विड फंड अशा डेट फंडांना म्हणतात त्यांच्यातील मोठा वाटा सरकारी बाँड मध्ये गुंतवला जातो. कंपन्या यामध्येच जास्त गुंतवणूक करतात. लिक्विड फंडातील गुंतवणूक वाढली असली तरी इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज योजनांमधील (ईएलएसएस) गुंतवणूक ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही घसरण सात महिन्यातील सर्वाधिक आहे. मोतीलाल ओसवाल एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष सौमैया यांनी सांगितले की, ही गुंतवणूक सरळ बाजाराच्या प्रदर्शनाशी जोडलेली आहे. गेल्या दोन महिन्यात बाजारात अनेक अडचणी दिसून आल्या आहेत, त्याचा सरळ परिणाम गुंतवणुकीवर दिसून आला. आॅगस्टमध्ये म्युच्युअल फंडात एकूण गुंतवणूक (अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट-एयूएम) २५.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती, जी आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे.

 

इक्विटीमधील गुंतवणूक कमी होऊन ८,४१४ कोटींवर  
ऑक्टोबरमध्ये इक्विटी योजनांमध्ये एकूण १२,६२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. नोव्हेंबरमध्ये यात ३३ टक्क्यांची घसरण हाेऊन गुंतवणूक ८,४१४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही घसरण गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा ८ महिन्यांतील सर्वाधिक होता. बॅलन्स्ड फंडात गुंतवणूकदारांनी केवळ २१५ कोटी रुपये गुंतवले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...