आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझाबुआ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशात दोन जाहीर सभा घेतल्या. झाबुआच्या सभेत त्यांनी काॅंग्रेसवर हल्लाबोल करत वाळवी नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे अत्यंत विषारी अाैषध वापरावे लागते, त्याप्रमाणे काॅंग्रेसच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार मुळापासून संपवण्यासाठी मी नोटबंदीसारखे कडवट व परिणामकारक अाैषध वापरले. यातून गाद्या-उशांकाली लपवलेल्या नाेटा, जाे गरिबांचा कष्टाचा पैसा हाेता ताे बँकात जमा करण्यास भाग पाडले. याच लपवलेल्या पैशांतून सध्या राज्यात बनणारी घरे, रस्ते, रुग्णालये, शाळा साकारल्या जात अाहेत.
मोदी म्हणाले- अामचे आदिवासी नागरिक दूर जंगलात जीवन जगत हाेते; परंतु अाता अापल्या मुलांनाही तसे जीवन मिळावे, अशी त्यांची इच्छा नाही. राज्यात काँग्रेसच्या कार्यकाळात सरपंचांना काम व गावात मातीचा रस्ता मागावे लागे. मात्र, शिवराज सिंहांनी गत १५ वर्षांत असे काम केले की, अाता आदिवासी डांबराच्या पक्क्या रस्त्याची मागणी करत अाहेत.
भाजप व संघाचा मिझाेरामची संस्कृती, भाषा संपवण्याचा प्रयत्न : राहुल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांन मिझाेरामच्या चंपाई येथे जाहीर सभा घेतली. ही त्यांची राज्यातील पहिलीच सभा हाेती. राहुल म्हणाले- भाजप व संघ प्रत्येक संस्थेत त्यांच्याच लोकांची भरती करत अाहेत. ते आरबीआय, निवडणूक आयोग, सीबीआयवर नियंत्रण मिळवू पाहत अाहेत. तसेच भारताच्या राज्यघटनेवरच हल्ले चढवत अाहेत. त्यामुळे त्यांना या वेळी केवळ मिझाेरामच नव्हे, तर संपूर्ण देशात पराभवाचे ताेंड पाहावे लागणार अाहे. प्रत्येक राज्यात भाजप व संघाचा प्रवेश कुठल्या तरी स्थानिक सहकाऱ्याच्या माध्यमातून हाेते. मला याचे दु:ख अाहे की, राज्यात भाजपचा संबंध या राज्यातील लोकांची भाषा व संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिझाे नॅशनल फ्रंटशी अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.